कारंजा शहरात सक्रिय क्षयरुग्णांची आरोग्य कर्मचाऱ्याकडून घरोघरी जाऊन शोध मोहीम.

 कारंजा शहरात सक्रिय क्षयरुग्णांची आरोग्य कर्मचाऱ्याकडून घरोघरी जाऊन शोध मोहीम.

----------------------------------

रिसोड. प्रतिनिधी

रणजीत सिंह ठाकुर 

---------------------------------- 

"कारंजा उपजिल्हा रुग्णालय क्षयरोग व कुष्ठरोग यांच्या पुढाकार"

 "उपजिल्हा रुग्णालय व क्षयरोग व तालुका आरोग्य कार्यालय यांच्या पुढाकार"

कारंजा ; दि.24,रोजी कारंजा "उपजिल्हा रुग्णालय व क्षयरोग व तालुका आरोग्य कार्यालय यांच्या  वतने कारंजा शहरात सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठरोग रुग्णांची आरोग्य कर्मचाऱ्याकडून घरोघरी जाऊन  (AFC) शोध मोहीम घेतली जात असून क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीचे रोगनिदान व क्षयरोगावरील औषधोपचार मोफत आरोग्य उपचार यासाठी संशयित क्षयरुग्णाचे रोगनिदान दवाखान्यात करण्यात आहे. त्यामुळे गृहभेटी देऊन घरात असलेल्या सर्व व्यक्तींची क्षयरोग लक्षणांविषयी माहिती घेतली जात असून क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीचा थुंकी नमुना गोळा करुन तपासणी करिता जवळच्या डी.एम.सी.ला पाठविणार येत असून यामध्ये क्षयरोग पर्यव्यक्षक राजेश चव्हाण,सिनियर ट्रॅटमेंट सुप्रवायझर निलेश पाटील, सिनियर ट्रॅटमेंट लॅबोटरी सुप्रवायझर रवी बर्गे , पर्यवेक्षक प्रतीक जाधव,(PPAS) क्षेत्रकार्य आधिकारी प्रदिप पट्टेबहादुर, बहुउद्देशीय आरोग्य शुभम थोटांगे कर्मचारी, अविनाश वानखेडे,आशा सेविका शेकीला रायलिवळे,आशा से.सुनिता मस्के, आशा से.जुली रायलीवाले, आशा से.शकीला बाई ,आशा सेविका निकम मॅडम आरोग्य कर्मचारी,अशा सेविका ह्या कारंजा शहरातील घरोघरी जाऊन माहिती देत आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम हा राज्यामध्ये सर्व जिल्हे व महानगरपालिकांमध्ये केंद्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वावर सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम ही २३ डीसेंबर २०२४ ते ०३ जानेवारी २०२५ कलावधी मधून.

 राबविण्यात येतो. या कार्यक्रमातंर्गत क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीचे रोगनिदान व क्षयरोगावरील औषधोपचार मोफत उपलब्ध आहे. यासाठी संशयित क्षयरुग्णाचे रोगनिदान दवाखान्यात करण्यात येते. फुपफुसाचा क्षयरोग असणारे बरेचसे रुग्ण होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे व त्याबाबत डॉक्टरांकडे जाण्याचे टाळत असल्याचे आढळले आहे. वरील बस्तुस्थिती पाहता केंद्रशासनातर्फे अदयापही क्षयरोग निदानापासून वंचित असणाऱ्या अवरुग्णांना गृहभेटीव्दारे शोधून काढण्यासाठी सन २०२४ मध्ये क्षयरुग्ण शोध मोहीम राज्यामध्ये राबविण्याचे ठरविलेले आहे. 

वाशिम जिल्हा आरोग्य विभाग व क्षयरोग विभागामार्फत  या विशेष मोहिमेतंर्गत वाशिम जिल्हयातील बंचित घटक उदा. झोपडप‌ट्टी, पोहचण्यासाठी अवघड गावे आणि वस्त्या, कारागृहातील कैदी, ज्या गावात रुम्प जास्त असू शकतात असे गावे, एचआयव्ही अतिजोखीम गट, असंघटित कामगार, बांधकाम स्थळाच्या ठिकाणी काम करणारे कामगार, बेघर, वृध्दाश्रम अशा निवडलेल्या भागांमध्ये सक्रियपणे 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोबरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रेश्मा पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश परभनकर , कारंजा तालुका आरोग्य अधिकारी डॉ . शंकर नांदे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.साळुंखे साहेब यांचा मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. राजा प्रसेनजीत अल्पसंख्यांक शिक्षण बहुउद्देशीय संस्था व नेहरू युवा बहुउद्देश्य मंडळ केकतउमरा व सर्वधर्म समभाव मित्र मंडळ यांचे  प्रतिनिधी यांचे विशेष सहकार्य मिळत आहे.


बॉक्स []


*क्षयरोगाची खालील प्रमाणे लक्षणे असतात.*


दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला असपे


तसेच दोन आठवडयापेक्षा मुदतीचा ताप असणे


मागील तीन महिन्यामध्ये वजनात लक्षणीय घट असणे


मागील सहा महिन्याच्या कालावधीत कधीही धुंकीबाटे रक्त पडत असणे


मागील एक महिन्यापासून छातीत दुखणे,


यापूर्वी क्षयरोगाचे उपचार घेतलेले असणे


  वरिलपैकि कोणतेही लक्षणे असल्यास सदर व्यक्तीने तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.