राष्ट्रीय महामार्ग तावडे हॉटेल नजिक पंचगंगेच्या पुलाखाली दूधगंगेच्या पाईपलाईनला गळती,हजारो लिटर पाणी वाया
राष्ट्रीय महामार्ग तावडे हॉटेल नजिक पंचगंगेच्या पुलाखाली दूधगंगेच्या पाईपलाईनला गळती,हजारो लिटर पाणी वाया
---------------------------------
अमित खांडेकर
----------------------------------
दूधगंगा नदीवरून शिरोली औदयोगिक वसाहतीला पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन ला तावडे हॉटेल येथील पंचगंगा पुलाखाली पुण्याकडे जाणाऱ्या दिशेला गेल्या आठ-दहा दिवसापासून मोठया प्रमाणावर गळती लागली आहे. पाण्याचे मोठे फवारे उडत आहेत. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.गेल्या आठ दिवसांपासून ही गळती सुरू असून ही गळती काढण्याची तसदी कोणीही घेतली नाही. या वाया जाणाऱ्या पाण्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याची देखभाल करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या च्या पाणीपुरवठा विभागाने याची तात्काळ गळती थांबवून दररोज वाया जाणारे हजारो लिटर पाणी थांबवावे अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे.
Comments
Post a Comment