मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षक संघटना मालेगाव यांची सहविचार सभा उत्साहात.

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षक संघटना मालेगाव यांची सहविचार सभा उत्साहात.

---------------------------------- 

रिसोड प्रतिनिधी.

रणजीत सिंह ठाकुर 

---------------------------------- 

प्रशिक्षणार्थी शिक्षक यांची विविध विषयांवर चर्चा**"

*मालेगाव :-* मालेगाव येथुन जवळच असलेल्या जोगदंड विद्यालय डव्हा येथे प्रशिक्षणार्थी शिक्षक यांची सहविचार सभा पार पडली.  

         यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरज अवचार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.कापुरे , गोपाल तारे, दादाराव शितोळे, अमोल मुठ्ठाळ, हर्षल उगलमुगले हे उपस्थित होते. 

       सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सभेचे उद्घाटन करुन मार्गदर्शन केले. संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरज अवचार यांनी सांगितले की, आपला मालेगाव तालुका जिल्ह्यात अग्रेसर आहे योग्य ती माहिती व समस्या सोडविण्यासाठी आतापर्यंत मी प्रयत्न केले व तुमच्या मी विश्वासाला तडा जावू देणार नाही असे सांगितले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षक या योजनेची माहिती देउन जिल्हा परिषद शाळेवर नियुक्त युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक यांना शासनाने कार्यकाळ व मानधन वाढवून देण्याची मागणी केली. या सहविचार सभेत प्रा. कापुरे सर यांनी फोनद्वारे पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गोपाल तारे यांनी सांगितले की, वाशिम येथे जिल्हा तरीय मिटींग ही २९ डिसेंबर २०२४ रोजी वार रविवार ला आयोजित केली असून आपण आतापर्यंत आम्हाला जो विश्वास दाखविला तो विश्वास कायम ठेवण्यासाठी होणाऱ्या जिल्हा तरीय मिटींग ला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आव्हान केले. 

         यावेळी सभेला संबोधित करताना दादाराव शितोळे यांनी सांगितले की, जिल्हयात नव्हे तर विदर्भात आम्ही संपर्कात आहेत व आपला मालेगाव अग्रेसर आहे व जिल्हाध्यक्ष हा मालेगाव तालुक्यातील असावा ही अपेक्षा व्यक्त केली व त्यांना सर्वानुमते मान्यता मिळाली. व हर्षल उगलमुगले यांनी सुद्धा सभेला संबोधित केले. 

           सदर सहविचार सभेला मालेगाव तालुक्यातील युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अंजु खरबीन यांनी तर आभार शुभांगी मुंढे यांनी मानले. 


...........................................

          प्रतिक्रिया 

...........................................


महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू केली असून बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून दिला आहे. मात्र या युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक यांना शासनाने कार्यकाळ व मानधन वाढवून दिले पाहिजे तसेच बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिले पाहिजेत


 *तालुकाध्यक्ष सुरज अवचार ( मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षक संघटना मालेगाव )*

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.