किसन वीर महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्टचे उद्धघाटन सोहळा उत्साहात संपन्न.
किसन वीर महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्टचे उद्धघाटन सोहळा उत्साहात संपन्न.
----------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
वाई : दि. २६/०१/२०२५ येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या इनडोअर स्पोर्टस् हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीन बॅडमिंटन कोर्टचे उद्धघाटन सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षा श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. मदनदादा भोसले उपस्थित होते.
उद्धघाटन सोहळ्याच्या निमित्ताने बोलताना श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले म्हणाल्या की,"किसन वीर महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे ३ बॅडमिंटन कोर्ट तयार करून; मा. मदनदादांनी ग्रामीण भागातील बॅडमिंटन खेळाडूंना राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याची एक नामी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या संधीचा लाभ या भागातील विद्यार्थी खेळाडू घेतीलच याची खात्री मला आहे. यासाठी सातारा जिल्हा बॅडमिंटन असोशिएशन आपणाला सर्वोतोपरी सहकार्य नक्कीच करेल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टचे उद्धाघाटन करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी जनता शिक्षण संस्थेचे, किसन वीर महाविद्यालयाचे, वाई जिमखान्याचे पदाधिकारी तसेच मा. मदनदादा भोसले यांचे विशेष आभार व्यक्त करते."
अध्यक्ष स्थानावरून बोलताना मदनदादा भोसले म्हणाले की, "जनता शिक्षण संस्था आणि किसन वीर महाविद्यालय या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पवित्र गंगोत्री आहे. या परिसरातील खेळाडूंनी विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी करून; आपले आणि महाविद्यालयाचे नाव देशपातळीवर रोशन करावे यासाठी २०१४ साली स्व. प्रतापराव भोसले यांनी १ कोटी ४० लाख रुपये खर्च करून इंनडोअर स्पोर्ट्स हॉलची निर्मिती केली परंतु कालांतराने या हॉलची अवस्था बिकट झाली. आज वाई जिमखाना व जनता शिक्षण संस्थेच्या सहभागातून इंनडोअर स्पोर्ट्स हॉलचे नूतनीकरण करताना आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्टची निर्मिती करून त्यास आधुनिक स्वरूप प्राप्त करून देण्यात आले. म्हणूनच आज खऱ्या अर्थाने स्व. प्रतापराव भोसले यांना आदरांजली देण्यात आली आहे. स्व. भाऊंच्या स्वप्नातील उच्च दर्जाचे खेळाडू या परिसरातून घडतील अशी आशा मी बाळगतो. या हॉलच्या नूतनीकरण करण्यासाठी १५ ते १६ लाख रुपये खर्च करून; वाई जिमखानाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड कष्ट घेतल्याचे मी पाहिले आहे म्हणून त्या सर्व पदाधिकाऱ्यांचेही मी जनता शिक्षण संस्थेच्या व किसन वीर महाविद्यालयाच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करतो." याप्रसंगी छत्रपती श्रीमंत वृषालीराजे भोसले यांनी सातारा जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षापासून स्व. प्रतापराव भोसले यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्याचे घोषित केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. प्रास्ताविकेत त्यांनी जनता शिक्षण संस्थेचा इतिहास आणि किसन वीर महाविद्यालयाची थोडक्यात माहिती उपस्थित मान्यवरांना करून दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाई जिमखान्याचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यालय प्रमुख श्री. बाळासाहेब टेमकर, श्री. जितेंद्र चव्हाण आदी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, संचालक श्री. केशवराव पाडळे श्री. रमेश डूबल तसेच वाई जिमखाना असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अमर कोल्हापुरे, उपाध्यक्ष ॲड. रमेश यादव, सचिव श्री सुनील शिंदे, कोषाध्यक्ष डॉ. मंगला अहिवळे, संचालक श्री. वैभव फुले, श्री. अमीर बागुल सर्व पदाधिकारी तसेच दिशा अकॅडमीचे डॉ. महेंद्र कदम, श्री. शैलेंद्र गोखले, श्री. नितीन वाघचौडे, सौ. प्रीती कोल्हापुरे, श्री. आनंद डूबल, श्री. तुकाराम जेधे, युवा नेते श्री. केतन भोसले, श्री. शिरीष देशपांडे हे मान्यवर तसेच महाविद्यालयातील तिनही शाखांचे उपप्राचार्य, डॉ. हणमंतराव कणसे, श्री. भिमराव पटकुरे, प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, कॅप्टन समीर पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे, पर्यवेक्षक श्री. अर्जुन जाधव वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी, वाई परिसरातील असंख्य कार्यकर्ते, बॅडमिंटन खेळाडू, बॅडमिंटन प्रेमी, विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार कु. रंगता बेडेकर यांनी मानले. सौ. मनीषा घैसास यांनी वंदे मातरम् सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment