विजचोरी प्रकरणी ५५ ग्राहकावर कारवाई; मिटर जप्त,धडक मोहीम सुरु.

 विजचोरी प्रकरणी ५५ ग्राहकावर कारवाई; मिटर जप्त,धडक मोहीम सुरु.

-------------------------------------

फ्रंटलाईन् न्युज महाराष्ट्र.

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

पी.एन.देशमुख.

-------------------------------------

अमरावती.

अमरावती जिल्ह्यातील  दर्यापुर तालुक्यात विज चोरीचे प्रमाण वाढत असुन माहावितरण उपविभागीय कार्यालयातील पथकाने दर्यापुर शहरासह  तालुक्यातील ग्रामीण भागात जानेवारी २0२५ सुरवातीलाच दर्यापुर शहरासह मीटरमध्ये छेडछाड करुन विजचोरी  करणाऱ्या ५५ ग्राहकांच्या विरोधात धडक कारवाई केली आहे.एकीकडे राज्यात ग्राहकांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे मात्र वीजचोरी करणार्यांची संख्याही वाढ होत असल्याने महावितरणने ही धडक मोहीम राबवीली आहे.मागील १२ दिवसापासुन दर्यापुर तालुक्यात ही मोहीम सुरु आहे.दर्यापुर तालुक्यातील बाभळी,जुना दर्यापुर,भामोद,म्हैसपुर,मुर्हादेवी ,उपराई अडुळाबाजार,कोकर्डा,खोलापुर, खल्लार हींगणी मिर्जापुर यासह विविध परिसरात विजमीटरची तपासणी करण्यात आली. यात ज्या मिटरमधे दोष आहेत ताब्यात घेण्यात आले.यात ज्या मीटरचे दोषीवर अशा ग्राहकांना दंड भरण्यास सांगुन पुन्हा कनेक्शन सुरु ठेवण्याची सुचना देण्यात  आली.विजचोरीतील मीटर ताब्यात घेण्यात आली असुन ,त्याची तपासणी केल्यानंतर ग्राहाकांवर  कारवाई करुन दंड ठोठाविण्यात येणार आहे.ज्या ग्राहकांनी गुन्हा कबुल केला नाही,अशा ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यात आले.ही कारवाई महावितरण चे उपविभागीय अभियंता विक्रांत काटोले,यांच्या मार्गदर्शनात,साह्यक अभियंता सोपन गायधने,सारंग गजभीये,व पथकातील कर्मचारी यांनी कार्यवाही केली.विजचोरी प्रकरणी अशी धडक मोहीम कारवाई सुरुच राहील .असे उपविभाग माहावीतरण कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.