किसन वीर महाविद्यालयातील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.
किसन वीर महाविद्यालयातील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.
----------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
वाई: येथील किसन वीर महाविद्यालयामध्ये देशभक्त कै. किसन तथा आबासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ एन.सी.सी, क्रीडा विभाग, विद्यार्थी विकास कक्ष आणि अक्षय ब्लड बँक, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये एकूण ९२ रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र काम केले. यामध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी महाविद्यालयाचे आजी-माजी एन.सी.सी. छात्र आणि विद्यार्थ्यांनीही रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला.
या शिबीराचे उदघाटन वाई पोलीस स्टेशन, वाईचे पी. एस. आय. बिपिन चव्हाण यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. या प्रसंगी २२ महाराष्ट्र बटालियन, सातारा चे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. ए. राजमनियार (सेना मेडल) यांनीही स्वत: उपस्थित राहून रक्तदान केले. याप्रसंगी श्री. मोहनआबा भोसले, श्री. सुनिल खैरे, एन.सी.सी. चीफ ऑफिसर महेश इनामदार यांची विशेष उपस्थिती होती.
पी. एस. आय. बिपिन चव्हाण म्हणाले की 'रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, आपण या शिबिराच्या माध्यमातून अनेकांना जीवनदान देण्याचे कार्य करत आहात. रक्तदान केल्याने रक्ताची जाडी कमी होते, रक्ताभिसरण वाढते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तदान करणे हा समाजाचा एक जबाबदारपणा आहे. त्यामुळे या पवित्र कार्यास माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या कार्यक्रमासाठी अक्षय ब्लड बँक सातारा चे डॉ. सतीश साळुंखे हे मार्गदर्शक म्हणून बोलताना म्हणाले की,' देशभक्त कै. किसन तथा आबासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ अशा प्रकारचे पवित्र कार्य किसन वीर महाविद्यालयाकडून गेली अनेक वर्षापासून सातत्याने होत आहे. त्यामुळे महाविद्यालयातील आयोजकांना विशेष धन्यवाद.'
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, महाविद्यालयातील एन.सी.सी, क्रीडा विभाग, आणि इतर महाविद्यालयातील विद्यार्थी, तसेच शिक्षक, कर्मचारी या शिबिरामध्ये उत्स्फूर्त सहभागी झालेले असल्याने मला अभिमान आहे. रक्तदानाइतकं पवित्र दान कोणतेही नाही. मी सहभागी रक्तदात्यांचे अभिनंदन करतो.
संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांनी शिबीरास भेट देवून रक्तदात्यांशी संवाद साधला व त्यांचे अभिनंदन करून शिबीरास शुभेच्छा दिल्या.
शिबिराचे प्रस्ताविक कॅप्टन डॉ. समीर पवार यांनी केले. तसेच आभार कु. श्वेता धनवडे तर सूत्रसंचालन श्रावणी धनावडे हिने केले. तसेच सीनियर अंडर ऑफिसर सानिका जाधव हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी मनोज शिंदे, गजानन जाधव, राहुल तायडे व प्रयोगशाळा परिचर दत्ता काळे यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment