मोप येथे स्व.लक्ष्मीबाई गायकवाड बहुउद्देशीय संस्थेतर्फे राष्ट्रीय युवक दिनानिमित्त व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन.
मोप येथे स्व.लक्ष्मीबाई गायकवाड बहुउद्देशीय संस्थेतर्फे राष्ट्रीय युवक दिनानिमित्त व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन.
--------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीतसिह. ठाकुर
--------------------------------
रिसोड ; स्व.लक्ष्मीबाई गायकवाड बहुउद्देशीय संस्था वाशिम तर्फे ज्ञानदृष्टी कोचिंग क्लासेस मोप येथे राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती व राष्ट्रीय युवक दिना निमित्त व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष श्री हरिदास बाजड हे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोप येथील प्रसिद्ध डॉक्टर श्री पंडित गिऱ्हे साहेब , बाल शिवाजी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ भोपाळे मॅडम, शिव मेडिकलच्या संचालिका सौ शितलताई गिऱ्हे , सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय
मोप चे ग्रंथपाल श्री प्रतापभाऊ मोरे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले डॉ. पंडित गिऱ्हे यांनी युवक हे देशाचा आधारस्तंभ असून युवकांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. शरीर ही संपत्ती असून आपली प्रगती करण्यासाठी या संपत्तीचे जतन केले पाहिजे. व्यसनमुक्त जगण्याचा खूप वेगळा आनंद असतो असे त्यांनी स्पष्ट केले. सौ भोपाळे मॅडम यांनी व्यसनाधीनता हा युवकांना लागलेला शाप असून आपण मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करून स्वतःला व्यसनापासून दूर ठेवले पाहिजे असे सांगितले. तर शितल मॅडम यांनी चे लहान युवक हे मोबाईल गेलेले असून हे सुद्धा एक खूप मोठे व्यसन असल्याचे सांगून त्यांचे शरीरावर वाईट परिणाम होत आहेत. प्रतापभाऊ मोरे यांनी आजचे युवकांनी वाईट व्यसनाकडे वळण्यापेक्षा पुस्तक वाचण्याचे व्यसन लावून घेतले पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाजड यांनी युवक दिनाचे महत्त्व सांगून संस्था आहे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम करीत राहील. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक ज्ञानेश्वरी नरवाडे तर सूत्रसंचालन प्रतीक नरवाडे व
आभार प्रदर्शन प्रज्वल नरवाडे यांनी केले. कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य युवक, विद्यार्थी व गावकरी मंडळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment