खुनाचा कट रचणार्या मुख्य आरोपीसह पाच जनांना अटक.
खुनाचा कट रचणार्या मुख्य आरोपीसह पाच जनांना अटक.
----------------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर.
---------------------------------
मेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 02 /1 /2025 रोजी संजय गणपती शेलार रा. अंधारी ता.जावली या इसमाचा रस्त्यावर संशयास्पद स्थितीत मुत्यु झालेचे आढळून आले होते.
सदर मृतदेहाचा पंचनामा करून
सदर मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता त्याच्या छातीवर मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले
दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी नुसार गुड्डी अन्वेषण शाखेचे अधिकारी व मेढा पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी यांनी सी सी टी व्ही च्या व मोबाईल सी डी आर मदतीने तपास करत संजय शेलार यांच्या मारेकरी रामचंद्र तुकाराम दुबळे यास ताब्यात घेऊन त्यांच्या कडे आधीक चौकशी केली असता त्याने अरुण बाजीराव कापसे याच्या सांगण्यावरून आपण खुन केला असल्याचे सांगितले
सदर खुनाचा कट अरुण कापसे रामचंद्र दुबळे विकास सावंत यांनी या खुनाचा कट रचला असल्याची माहिती पोलिसांना दिली .
खुन झाल्यानंतर मारेकरी पसार झाले होते.
या खुनाचा तपास पोलीस अधीक्षक समिर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचिम, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे ,सपोनी अश्विनी पाटील सपोनी अमोल गवळी पोलीस उपनिरीक्षक पागांरे शिंगाडे मेढा पोलीस स्टेशनच्या पोलीस अंमलदार यांनी कौशल्य पुर्ण तपास करत मुख्य तिन आरोपीसह त्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोन आरोपीसह पाच आरोपींना गजाआड केलं
सदर आरोपींना माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे
Comments
Post a Comment