रुकडी येथील पंचकल्याणीक पूजेत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची उपस्थिती लाभणार.

 रुकडी येथील पंचकल्याणीक पूजेत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची उपस्थिती लाभणार.

---------------------------       

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

--------------------------- 

रुकडी ता. हातकणंगले या आचार्य रत्न 108 बाहुबलीजी महाराज यांच्या जन्म गावी   अष्टापद तीर्थ हे क्षेत्र प्रथम गणिनी प्रमुख आर्यीका 105 मुक्ती लक्ष्मी माताजी यांच्या प्रेरणेने निर्माण होत आहे या क्षेत्रावरती  19 जानेवारी ते 25 जानेवारी अखेर पंचकल्याणीक प्रतिष्ठा महामहोत्सव सोहळा संपन्न होत असून या सोहळ्यासाठी सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष खासदार धैर्यशील माने व आमदार अशोक बापू माने यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना निमंत्रण दिले असून दोघांनीही सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले .*

       *मुंबईतील त्यांच्या कार्यालयात श्रावक किरण पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना रीतसर निमंत्रण दिले असून दोघांनीही सोहळ्यास येणार असल्याचे मान्य केले असुन येत्या दोन दिवसात योग्य ती तारीख कळेल असे पाटील यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.