आ. चिखलीकर यांनी घेतला लोहा - कंधार मधील विविध विकास कामांचा आढावा : प्रलंबित कामे नियोजित वेळी पूर्ण करण्याच्या प्रशासनाला दिल्या सूचना.
आ. चिखलीकर यांनी घेतला लोहा - कंधार मधील विविध विकास कामांचा आढावा : प्रलंबित कामे नियोजित वेळी पूर्ण करण्याच्या प्रशासनाला दिल्या सूचना.
---------------------------
लोहा प्रतिनिधी
अंबादास पवार
---------------------------
लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय योजनांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करा . लाभार्थ्यांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी काटेकोरपणे नियोजन करा अशा सूचना आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत . नांदेड येथील जिल्हा नियजन भवनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आ. चिखलीकर हे होते . यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुखही बैठकीला उपस्थित होते.
कंधार आणि लोहा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेऊन गऊळ येथील लाल कंधारी संशोधन केंद्राचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला . याच बैठकीत जलसंपदा विभागाच्या विविध कामांचा आढावा आ. चिखलीकर यांनी घेतला.
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकासोबतही आ. चिखलीकर यांनी बैठक घेतली असून या बैठकीत कंधार बस स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत एसटी बस सोडण्यासाठी त्यांनी सूचना केल्या . उस्माननगर येथे येणारी प्रत्येक एसटी बस उस्मान नगर गावातील बस स्टँड पर्यंत सोडण्यासाठी त्यांनी संबंधिताला सूचना दिल्या . शिराढोण - नांदेड एसटी बस हमपस्वामी सभागरापर्यंत सोडण्यात यावी आणि उदगीर जांब - दिग्रस- कंधार -पांगरा -उस्मान नगर फाटा ही एसटी बस शिराढोण गावापर्यंत सोडावी अशा सूचना यावेळी आ. चिखलीकर यांनी दिल्या आहेत. याशिवाय कंधार - लोहा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल , उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार , कंधार च्या प्रभारी तहसीलदार आयएएस अधिकारी अनुष्का शर्मा , निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर , लोह्याचे तहसीलदार विठ्ठल परळीकर , धोंड प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गरुड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार , जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता चोपडे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गलधर , कार्यकारी अभियंता मुगदल , कार्यकारी अभियंता चौगुले, कार्यकारी अभियंता बनसोडे, जलसंधारण अधिकारी कांबळे , भोजराज , राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक वडदकर यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
Comments
Post a Comment