हातकणंगले दुय्यम निबंधक श्रेणी-1 दिलीपकुमार काळे यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळे त्यांची मुख्यालय अथवा अन्यत्र बदली करणेबाबत निवेदन.

 हातकणंगले दुय्यम निबंधक श्रेणी-1 दिलीपकुमार काळे यांच्या हुकुमशाही वृत्तीमुळे त्यांची मुख्यालय अथवा अन्यत्र बदली करणेबाबत निवेदन.

-----------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

-----------------------------

हातकणंगले दुय्यम निबंधक श्रेणी 1 या कार्यालयामध्ये श्री दिलीपकुमार काळे हे दिनांक 17/10/2022 इ. रोजी रुजु झाले आहेत. काळे हे हजर झाले पासुन त्यांची कारकीर्द अनेक कारणाने वादग्रस्त ठरली आहे. त्यांच्याबाबत नोंदणीसाठी येणा-या शेकडो पक्षकारांच्या तक्रारी आहेत. कार्यालयामध्ये दररोज 50 हून अधिक दस्तांची नोदणी होत असते पण सकाळी वेळेत कामकाज चालु करण्याऐवजी कार्यालयामध्ये विनाकारण कामकाजात संबंध नसणा-या व्यक्तिंना घेवून बसतात त्याच बरोबर दस्त लेखनिक, मुद्रांक विक्रेते व नागरिकांना केबीनचे दोन्हीही दरवाजे आतुन बंद करुन सर्वाना ताटळत बसवतात दोन मोबाईल बघत अनावश्यक टाईमपास करतात त्यामुळे दस्त नोंदणी कार्यालयीन नियमाप्रमाणे 10.00 वा. चालु होण्याऐवजी 11.30 ते 12.30 नंतर दस्त नोदणीस सुरुवात होते. त्यामुळे दिवसभर दस्त नोंदणीस विलंब होत असल्याने 10.00 वा. आलेल्या पक्षकारांना दिवसभर ताट्ळेत बसावे लागत असुन यामुळे वयोवृद्ध, रुग्ण, गरोदर स्त्रिया यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.


दुय्यम निबंधक श्रेणी -1 या पदावर काळे हजर झालेपासून दस्त लेखनिक, मुद्रांक विक्रेते व वकील यांच्यामध्ये दस्त नोदणीस नंबर लावणेसाठी विनाकारण चढाओढ लावली जात असुन त्यामुळे कार्यालयामध्ये वादावादी, एकमेकास शिविगाळ असे वादाचे प्रसंग नित्याचे झाले आहेत. हा सर्व प्रकार काळे हे उघड्या डोळ्याने नुसते बघत राहतात. त्याचबरोबर दस्तास नंबर लावणेसाठी रात्री 12.00 वाजले पासुन पक्षकारांना जागत बसावे लागते. ब-याचवेळी अनेक दस्त नोदविता येत नाही असे श्री काळे यांच्याकडून सांगितले जाते मात्र दुसरा एखादा कोणीतरी आल्यानंतर तो दस्त नोंदविला जातो यातुन विनाकारण दस्त लेखनिक, मुद्रांक विक्रेते व वकील याच्यामध्ये वादा-वादी घडविणेचे काम त्यांच्याकडून होत आहे.

          शासकीय परिपत्रकाप्रमाणे दस्त नोदणी करता येत असताना सुद्धा जाणुन बुजुन त्रास देण्याच्या उद्देशाने अनेकदा कायदेशिर दस्त नोदणी करणे आवश्यक असुनही नोदविला जात नाही. यामुळे काळे यांचेकडून शासनाचे मोठ्या प्रमाणावर महसुली नुकसान होत आहे. दुय्यम निबंधक कार्यालय हे सामान्य नागकरीकांचे असुनसुद्धा श्री काळे दिवसभर सगळ्यांना बाहेर हाकला तसेच दस्त बाहेर नेवुन ठेवा मला लागेल त्यावेळी मी मागुन घेतो अशी आरेरावीची भाषा वापरून नागरीकाना त्याच्याकडे दस्त नोंदणीसाठी विनंती करीत उभा रहावे लागते. तरोच आजअखेर श्री काळे यांचे काळात माहिती अधिकार सर्वाधिक दाखल झालेअसुन त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही देखील झालेली आहे.

        अधिकारी काळे हे नागरिकांचे अधिकार हिरावुन घेवुन वैयक्तिक स्वतःचे कार्यालय असल्यासारखे हुकुमशाही वृत्तीने वागतात आणि सर्वांनाच अपमानास्पद वागणुक देतात. तसेच विनाकारण काही बिनकामाच्या लोकांना बसवुन घेवुन टिंगल टवाळी करण्यात मग्न असतात.सकाळी 10.00 वाजता कार्यालयीन कामकाज कायद्याने सुरु करणेचा नियम असताना सुद्धा श्री काळे हे 10.00 ते 6.00 या वेळेत वहुतांशवेळा एकाच वेळी दोन दोन मोबाईलवर चॅटींगसह रिल्स व फेसबुक बघण्यात वेळ घालवितात त्यामुळे नागरिकांना त्याच्याकडे दस्त नोंदणीसाठी विनंती करीत उभा रहावे लागते. तसेच आजअखेर श्री काळे यांचे काळात माहिती अधिकार सर्वाधिक दाखल झालेअसुन त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही देखील झालेली आहे.

       दुय्यम निबंधक काळे यांचे विरुद्ध लाचलुचपत विभागाकडे तक्रार होणार असल्याचे समजते व न्यायालयातून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार असल्याचे एका पक्षकाराने बोलुन दाखविले आहे. तरी आपल्या मुद्रांक विभागाची बदनामी होवु नये व वरील सर्व विषयांचा गाभिर्याने विचार करुन श्री काळे यांची जिल्हा मुद्रांक मुख्यालयाकडे अथवा अन्यत्र बदली करावी हि विंनती तसेच श्री काळे यांच्या त्रासाला कंटाळुन दिनांक 17/02/2025 पासून हातकणंगले तालुका दस्त लेखनिक व मुद्रांक संघटनेच्या वतीने हातकणंगले दुय्यम निबंधक कार्यालया समोर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शांततेच्या मार्गाने दुय्यम निबंधक कार्यालयाला टाळे लावुन निषेध नोदवत बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहे. तरी याची दखल घेवुन आपल्या कार्यालया कडून योग्य ती कार्यवाही व्हावी. विद्यमान आमदार खासदार व जिल्हा उपनिबंधक कार्यालय जिल्हाधिकारी यांच्याकडे मुद्रांक विक्रेता संघटनेने केली आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.