मयूर फाटा येथे 12 चाकी ट्रक महामार्गावरून सेवा रस्त्यावर कोसळला :- रोडवरती कोल्ड्रिंक्सच्या बाटल्याच बाटल्या.

 मयूर फाटा येथे 12 चाकी ट्रक महामार्गावरून सेवा रस्त्यावर कोसळला :-  रोडवरती कोल्ड्रिंक्सच्या  बाटल्याच बाटल्या.

--------------------------- 

शिरोली प्रतिनिधी

अमीत खांडेकर 

--------------------------- 

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी 3 च्या सुमारास शिरोली एमआयडीसी येथील मयूर फाटा येथील उड्डाणपुलावर 12 चाकी ट्रक महामार्गावरून सेवा रस्त्यावर कोसळला. 

सविस्तर माहिती अशी की, नवनाथ खंडू खोतमाळी रा.शिरूर,जिल्हा पुणे  हा चालक  ट्रक क्रं.एम एच १६ सी ए ८२५० घेऊन आज सकाळी 6 वाजता सुपा, अहमदनगर येथून कोल्ड्रिंक्स च्या बाटल्या भरून कोल्हापूर येथील मुडशिंगी येथे येण्यासाठी निघाला होता. दुपारी 3 च्या सुमारास हा ट्रक शिरोली एमआयडीसी येथील मयूर फाटा येथे आला असता चालकाला डुलकी लागल्याने आणि अचानक दु चाकी आडवी आल्याने ड्रायव्हर चलबिचल झाला.आणि ट्रक थेट महामार्गावरून  सेवा रस्त्यावर कोसळला. यावेळी सेवा रस्त्यावरून जाणारा दुचाकी स्वार थोडक्यात बचावला.नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.हा ट्रक अहमदनगर येथील रोकडे ट्रान्सपोर्ट चा असल्याचे समजते.या अपघातात ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला आहे.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 शिरोली एमआयडीसी मुळे हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो. पण आज सोमवार सुट्टी असल्याने वर्दळ कमी होती.घटना समजताच शिरोली एमआयडीसी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सेवा रस्त्यावर कोल्ड्रिंक्स च्या बाटल्यांचा खच पडला होता. काही फुकट्यानी कोल्ड्रिंक्स च्या बाटल्या लंपास केल्या.त्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवली.या अपघातात 12 चाकी ट्रक चे मोठे नुकसान झाले आहे.त्यानंतर काहीवेळात ट्रान्सपोर्ट मालकाने दुसऱ्या ट्रक ची व्यवस्था करून माल क्रॉसिंग करून घेतला.त्यानंतर क्रेन च्या सहाय्याने ट्रक बाजुला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.दोन तीन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी ट्रक कोसळला होता.त्यामुळे हा उड्डाणपूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.