आईच्या नावाने मेडिकल सुरू करणारा सुदर्शन आदर्शवत: आमदार नायकवडी.
आईच्या नावाने मेडिकल सुरू करणारा सुदर्शन आदर्शवत: आमदार नायकवडी.
-----------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
-----------------------------------
मिरज: आईच्या नावाने लक्ष्मी जनसेवा जनरिक मेडिकल स्टोअर सुरू करणारा मुलगा सुदर्शन केमकर याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असे मत आमदार इद्रिस नायकवडी यांनी व्यक्त केले .या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर होते .
येथील जुबली कन्या शाळेचे उपमुख्याध्यापक निवृत्त मुख्याध्यापक डी बी केमकर व म.द.करमकर विद्यालयाच्या निवृत्त शिक्षिका लक्ष्मी केमकर यांचा मुलगा सुदर्शन याने फार्मसी चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अशा टॉकीज जवळ आपल्या आईच्या नावाने लक्ष्मी जनसेवा जनरिक मेडिकल स्टोअर या नावाने दुकान सुरू केले .या दुकानाचे उद्घाटन सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ व रोटरी क्लबचे सचिव डॉ.रियाज मुजावर व नूतन आमदार इद्रीस नायकवडी यांच्या हस्ते झाले. डॉ.दत्तात्रेय केमकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ शामल केमकर यांनी आभार मानले. डॉ.शुभांगी केमकर मोहिते यांनी सूत्रसंचालन केले
Comments
Post a Comment