मुरगूड शहरात पोलिसांचा रूट मार्च.
मुरगूड शहरात पोलिसांचा रूट मार्च.
-----------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
-----------------------------------
आगामी शासकीय शिवजयंती व महाशिवरात्री सण उत्सव शांततेत पार पाडण्याचे एसटी स्टँड मुरगुड परिसर या ठिकाणी दंगल काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली सदर दंगल काबू योजना प्रात्यक्षिक पार पडल्यानंतर मुरगुड एसटी स्टँड ,मुरगूड नाका- मुख्य बाजारपेठ ,कबरस्थान मशीद रोड मुरगूड अशा मार्गे कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आलेला आहे .सदर दंगल काबू योजना व रूट मार्च करिता मुरगुड पोलीस ठाणे कडील 2 अधिकारी , 20 पोलिस अमलदार व आरसीपी मुख्यालय कडील 1 अधिकारी, 39 अंमलदार,17 होमगार्ड हजर होते. तसेच मुरगूड ग्रामीण रुग्णालय कडील वैद्यकीय अधिकारी व ॲम्बुलन्स पथक, मुरगुड नगरपरिषद कार्यालयाकडील अग्निशामक दल पथक उपलब्ध ठेवण्यात आलेले होते.सदरची रंगीत तालीम घेऊन सर्व अधिकारी ,पोलीस अंमलदार व उपस्थित लोकांना रंगीत तालीम चा आशय व उद्देश समजावून सांगितला आहे.
Comments
Post a Comment