मुर्तीकारांच्या समस्यांसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांची ग्वाहि.

 मुर्तीकारांच्या समस्यांसाठी शासन दरबारी प्रयत्न करणार जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांची ग्वाहि.

-------------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

-------------------------------------

*गणेशमूर्ती बनवण्यासाठी पीओपीवर बंदी आणल्याने राज्यातील मूर्तिकारांवर बेरोजगारीचे संकट आले आहे.या गणेशमूर्ती पीओपीवरील बंदी उठवण्यात यावी* यासाठी

 *श्री संत गोरोबाकाका कुंभार मुर्तिकार व विक्रेता संघटना इचलकरंजी* यांनी 

कोल्हापुर शिवसेना जिल्हाप्रमुख

*श्री रविंद्र माने साहेब*

यांना *भेटून निवेदन* दिले. *अनेकांच्या रोजगारावर गदा येणार असल्याने जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी हा विषय*

शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री

*श्री एकनाथ शिंदे साहेब*

यांची *भेट घेवुन कुंभार समाजावर पी ओ पी गणेश मुर्ती बंदी संदर्भात व मुर्तीकारांवर होत असलेल्या समस्याबाबतची मागणी सादर करण्याची ग्वाही* दिली. *इचलकरंजी शहरातील मुर्तिकारांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी मूर्तिकारांना आश्वासन दिले* याप्रसंगी

*श्री संत गोरोबाकाका कुंभार मुर्तिकार व विक्रेता संघटनेचे*

*श्री सुभाष कुंभार,श्री रविंद्र कुंभार,श्री बाळु कुंभार,श्री बजरंग कुंभार,श्री विवेक कुंभार,रेंदाळ येथील श्री मिलिंद कुंभार,श्री कृष्णात कुंभार तारदाळ येथील श्री प्रकाश कुंभार,माणकापुर येथील श्री गंभीर कुंभार, हातकणंगले येथील श्री अजय कुंभार,श्री वैभव कुंभार,श्री तेजस कुंभार,श्री विजय कुंभार,श्री यशवंत कुंभार,श्री ज्ञानराज कुंभार,तारदाळ येथील श्री महेश कुंभार, वाठार येथील श्री विजय कुंभार,श्री गणेश कुंभार, पेठवडगाव येथील श्री विजय कुंभार,श्री प्रथमेश कुंभार,श्री अक्षय कुंभार,श्री महेश कुंभार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.