उचगावात मोटरसायकल स्वारास मारहाण दहा जणांवर गुन्हा दाखल.चौघांना अटक.

 उचगावात मोटरसायकल स्वारास मारहाण दहा जणांवर गुन्हा दाखल.चौघांना अटक.

------------------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

------------------------------------

गांधीनगर:- उचगाव ता. करवीर येथील निगडे बिल्डिंग सर्विस रोडवर मोटर सायकल धडकल्याच्या राग मनात धरून पाच ते सहा जणांनी फायटर आणि दगडाने मारहाण केल्याने संतोष नेताजी माने (वय 27,रा. बाबा नगर उचगाव ता. करवीर) हा युवक गंभीर जखमी झाला. यावरून गांधीनगर पोलीस ठाण्यात चौघासह अज्ञात पाच ते सहा जणांवर गुन्हा नोंद झाला . 


यावरून नौमान रहिम शेख (वय 19), शाहरुख मुराद मोमीन, (वय30) दोघे,रा. मनेर मळा उचगाव), स्वरूप उर्फ स्वरप्या रमेश सावंत (वय19 रा . लक्ष्मी कॉलनी टेंबलाई नगर कोल्हापूर), आस्तिक आप्पासो म्हातुगडे (वय 22 रा. तामगाव ता करवीर), अशा चौघांना पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद जखमी संतोष माने यांने गांधीनगर पोलिसात दिली. 

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी संतोष माने हा उचगाव निगडे बिल्डिंगच्या सर्विस रोडने मोटरसायकलने घरी जात होता. त्यावेळी नौमान याच्या मोटरसायकलने समोरासमोर धडक दिली. त्यावेळी संतोष खाली पडला. त्या वेळा सोबत असलेल्या आठ ते नऊ जणांनी मिळून दगडाने आणि फायटरने संतोषला जबर मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. आणि त्याच्या दुचाकीचेही नुकसान केले.  गांधीनगर पोलिसांनी एकूण दहा जनावर गन्हा दाखल करण्यात आला त्यापैकी चौघांना अटक केली. जखमीला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. वरील चौघां आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीधर सावंत करीत आहेत.


 

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.