ग्रामपंचायत पोर्ले तर्फ ठाणे येथे गुणवंतांचा सत्कार.
ग्रामपंचायत पोर्ले तर्फ ठाणे येथे गुणवंतांचा सत्कार.
-----------------------------------------
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
-----------------------------------------
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेणेत आलेल्या परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत पोर्ले तर्फ ठाणे मार्फत सत्कार करणेत आला.त्यामध्ये विशाल मारुती धनगर (महसूल सहाय्यक), हर्षद रामचंद्र सावंत (महसूल सहाय्यक), वासंती नागेश जाधव (महसूल सहाय्यक), संजीवनी श्रीकांत चौगुले (महसूल सहाय्यक), चित्रा राजेंद्र पाटील (कर सहाय्यक व महसूल सहाय्यक), शुभम चंद्रकांत खवरे (महसूल सहाय्यक) यांचा फेटा,शाल व श्रीफळ देऊन ग्रामपंचायतीचे मासिक सभेमध्ये सत्कार करणेत आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देणेत आल्या.यावेळी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment