महावितरणचा कोल्हापूर व सांगलीतील वीजचोरांना दणका विशेष मोहिमेत ७६ वीजचोरांवर कारवाई.

 महावितरणचा कोल्हापूर व सांगलीतील वीजचोरांना दणका विशेष मोहिमेत ७६ वीजचोरांवर कारवाई.

---------------------------- 

कोल्हापूर प्रतिनिधी

---------------------------- 

सांगली, दि. १३ फेब्रुवारी २०२५:* कोल्हापूर परिमंडल कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात एकाच दिवशी राबविलेल्या विशेष मोहिमेत ७६ ठिकाणी अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका देण्यात आला आहे. यामध्ये वीजतारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार केलेल्या ६० वीजचोऱ्यांचा समावेश आहे. नियमानुसार दंड व वीजचोरीच्या रकमेचा भरणा न करणाऱ्या या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा – २००३च्या  कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. तर कलम १२६ प्रमाणे अनधिकृत वीजवापराचे १६ प्रकार आढळून आले आहेत.


वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध कोल्हापूर परिमंडल अंतर्गत नियमित कारवाई सुरु असते.  त्यानुसार कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये शनिवारी (दि. ८) वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ४८१० तर सांगली जिल्ह्यात २४३२ वीज ग्राहकांची तपासणी करण्यात आली. 


या वीजचोरीविरुद्ध मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यात ३७ वीज ग्राहकांकडून एकूण ३०,२१८ युनिटची वीज चोरी करण्यात आली असून पैकी ०६ ग्राहकांकडून ६० हजारांची वसुली करण्यात आली आहे तर सांगली जिल्ह्यात ३९ वीज ग्राहकांकडून एकूण २४,७०५ युनिटची वीज चोरी करण्यात आली असून पैकी ०४ ग्राहकांकडून ५१ हजारांची वसुली करण्यात आली आहे. वरील सर्वच वीजचोरी प्रकरणांत सबंधित वीज ग्राहकांना दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीजवापराप्रमाणे वीज बिल देण्यात आले आहे. या संपूर्ण बिलाची रक्कम ग्राहकांनी भरली नाही तर त्यांच्याविरुद्ध कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.


*वीजचोरीविरुद्धची मोहीम आणखी तीव्र करा*


वीजचोरीविरुद्ध नियमितपणे सुरु असलेली मोहीम आणखी तीव्र करण्याचे निर्देश कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी दिले आहेत. विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घेऊन सुरक्षित वीजपुरवठा घ्यावा व फौजदारी कारवाई व कारावासाची शिक्षा टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.