दौलतवाडीत गवा रेडा विहिरीत पडल्याने खळबळ, पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी!
दौलतवाडीत गवा रेडा विहिरीत पडल्याने खळबळ, पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी!
------------------------------
मुरगूड/ जोतीराम कुंभार
------------------------------
दौलतवाडी येथे आज सकाळी एक थरारक घटना घडली. गावाजवळील राजू गणपती कानडे यांच्या खोल विहिरीत तब्बल ६०० किलो वजनाचा गवा रेडा पडला, यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली. गव्याच्या गर्जनेसह लोकांची धावपळ सुरू झाली, आणि पाहता पाहता घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली.
गव्याला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी तातडीने प्रयत्न सुरू केले, मात्र त्याच्या प्रचंड वजनामुळे हे काम कठीण बनले. अखेर वन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. क्रेन, दोरखंड आणि तज्ज्ञांच्या मदतीने गवा रेड्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे दौलतवाडीत मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली असून, नागरिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर कुतूहलाचा विषय बनला आहे. प्रशासनाने गर्दी हटवण्याचे आवाहन केले असून, बचावकार्य अद्याप सुरू आहे.
बचावकार्यासाठी कोल्हापूर रेस्कु टिमचे प्रदिप सुतार ,अमोल चव्हाण, अशुतोष सुर्यवंशी, वनरक्षक राहूल जोनवाल (हसूर खुर्द), ए. व्हि. भुरटे( कापशी वनपाल), सागर पांढरे( वनरक्षक कायशी), मुरगूड पोलिस स्टेशनचे सर्व सहकारी,सजैराव भाट, पोलिस पाटील अश्विनी अस्वले या सर्वांनी गव्याला बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment