मुरगुड मध्ये छावा चित्रपटाचे जोरदार स्वागत.
मुरगुड मध्ये छावा चित्रपटाचे जोरदार स्वागत.
-------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
-------------------------------
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाचे मुरगूड येथे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून साखर वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण जीवन सांगणारा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला आहे सर्वच ठिकाणी या चित्रपटाचे जोरदार स्वागत केले जात आहे सध्या आपल्या मुलांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समजावा म्हणून बॉलिवूडमध्ये करण्यात आलेल्या या प्रयत्नाचे कौतुक संकेत भोसले यांनी बोलताना केले पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट पाहण्यासाठी पुढचे सगळे शो देखील असेच फुल होतील असा अंदाज सिनेमागृहाचे मालक खाशाबा भोसले यांनी व्यक्त केला. यावेळी नागरिक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, प्रकाश पारिशवाड, निखिल पाटील, अमृत पोतदार,सागर हळदकर, प्रशांत कांबळे ,तानाजी डवरी त्यांच्यासह नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment