सेनापती कापशी येथे नातवानेच केला आजीचा घात

 सेनापती कापशी येथे नातवानेच केला आजीचा घात.


------------------------------------

मुरगूड प्रतिनिधी

 जोतीराम कुंभार

------------------------------------

सेनापती कापशी येथे पैसे उसने न दिल्यामुळे एका नातवानेच आजीचा खून केला अशी बातमी समोर येत आहे.. बातमी अशी की आरोपी गणेश राजाराम चौगुले हा विक्रम नगर इचलकरंजी मध्ये राहत होता आरोपीने काढलेले कर्ज फेडण्यासाठी आरोपीने विक्रमनगर, इचलकरंजी  येथील राहते घर विकले होते पण तरीही अजून काही रक्कम देणे बाकी होते.





 सेनापती कापशी येथे राहणाऱ्या सगुना तुकाराम जाधव या आपल्या आजीच्या बँक खात्यामध्ये दोन लाख रुपयांची रक्कम आहे ही गोष्ट आरोपी जाणून होता यामुळेच आरोपी वारंवार आपल्या आजीकडे एक लाख रुपये उसने मागत होता पण आजीला देखील आपल्या नातवाविषयी संपूर्ण माहिती असल्यामुळे आजी उसने पैसे देण्यासाठी नकार देत होती बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी आरोपी गणेश चौगुले त्याच्या दोन मित्रांसह कापशी येथील आपल्या आजीच्या घरी पुन्हा उसने पैसे मागण्यासाठी आला होता पण आजीने  दरवेळी प्रमाणे नकार दिल्यामुळे आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आजीचा गळा आवळून, डोके आपटून तिला ठार मारल्याची घटना समोर येत आहे ठार मारून आजीच्या हातातील सोन्याच्या दोन पाटल्या व कानातील सोन्याची कर्णफुले  काढून नेली होती या बाबतची फिर्याद मुरगुड पोलीस स्टेशन येथे सेनापती कापशी येथील सुशांत पुंडलिक जाधव यांनी दिली आहे.. पुढील अधिक तपास मुरगुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षण बाबासाहेब सरवदे करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.