महिलांनी आपले कर्तृत्व सिध्द करावे : वनरक्षक सुरेखा पाटील.
महिलांनी आपले कर्तृत्व सिध्द करावे : वनरक्षक सुरेखा पाटील.
-----------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------------
आजच्या जगाच्या सर्वच समस्यांना समर्थपणे सामोरे जात महिलांनी सर्वच आघाड्यावर महिलांनी पूढे होवून आपले कर्तृत्व सिध्द करावे व त्यातून स्वत:ला सिध्द करावे असे आवाहन वन विभाग राधानगरी च्या नियत क्षेत्र अधिकारी,वनरक्षक सुरेखा पाटील यांनी केले.त्या बोरवडे( ता कागल) येथील बोरवडे विद्यालय व आर्या एच. पी .गँस बिद्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.डॉ शर्मिला बलुगडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
वनरक्षक,नियत क्षेत्र अधिकारी सुरेखा पाटील पुढे म्हणाल्या की महिला जसे स्वत:च्या कुटुंबाकडे काळजीपुर्वक पाहातात तसे त्यांनी स्वत:च्या आरोग्याकडेही पाहावे.स्वत:चे उन्नतीकरण करण्यासाठी नेहमी धडपड करावी. स्वत:च्या व्यक्तिमत्वाचा आदर्श निर्माण करावा त्यामूळे समाजातील सर्व घटक स्त्रीयाकडे आदराने पाहातील. शासनाने महिला सक्ष्मीकरणासाठी अनेक माध्यम विकासाच्या योजना दिल्या आहेत त्याचा लाभ घ्यावा.व सर्वांनी उन्न्तीचा मार्ग पत्करावा.
यावेळी महिलांच्या उखाणे स्पर्धा घेण्यात आल्या.विजेत्या महिलांना आर्या एच पी गँस यांच्या वतीने संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या.
यावेळी मनिषा वारके,राधिका शिंदे, आदिंनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी शुभांगी भांदिगरे,राधिका शिंदे,गिता बलुगडे, रेखा मांगोरे, आनंदी पाटील,छाया वचाटे, माधुरी साठे,कमल साठे,ललिता कांबळे आदि प्रमुख उपस्थीत होत्या. यावेळी हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्ताविक राधिका शिंदे यांनी केले यांनी सुत्र संचालन शुभांगी भांदिगरे यांनी केले तर आभार रेखा मांगोरे यांनी मानले,
Comments
Post a Comment