नागाव फाटा येथे ट्रकच्या धडकेत कार गाडीचे मोठे नुकसान सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
नागाव फाटा येथे ट्रकच्या धडकेत कार गाडीचे मोठे नुकसान सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
------------------------------------
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
------------------------------------
बुधवारी रात्री दहाच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा नजीक ओम दत्त साई पेट्रोल पंप समोर दोन ट्रकच्या मध्ये आलिशान गाडीचा चक्काचूर झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की, किशोर कदम रा. फलटण हे आपल्या पत्नीसह कर्नाटक येथे देशी औषध आणण्यासाठी निघाले होते. रात्री दहाच्या सुमारास त्यांची ईरटीगा कार गाडी नागाव फाटा येथील ओम साई पेट्रोल पंपा समोर आली असता अचानक पंपामधून एक 12 चाकी ट्रक महामार्गावर उलट्या दिशेने बाहेर पडत होता.त्यामुळे कार चालक किशोर यांनी जोराचा ब्रेक मारला.त्याचवेळी त्यांच्या पाठोपाठ असणाऱ्या ट्रकला अचानक कार गाडी थांबल्यामुळे गाडी नियंत्रित करताना आली नसल्यामुळे कारला ट्रक ने जोराची धडक दिली. या धडकेत ही कार गाडी समोरच्या ट्रक वर जोरात आदळली. दोन्ही ट्रकच्या मध्ये या कारचा चक्काचुर झाला. कार गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.कार गाडीतील एअरबॅग्ज ओपन झाल्यामुळे किशोर व त्यांच्या पत्नीचे प्राण वाचले. त्यांच्या पत्नीला जोराचा मार लागला आहे.तर किशोर हे किरकोळ जखमी झाले आहेत.अपघातानंतर 12 चाकी ट्रक चालकाने पळ काढला.
नशीब बलवत्तर म्हणून या जोडप्याचे प्राण वाचले. या घटनेची नोंद रात्री उशीरापर्यंत झाली नव्हती.
उलट्या दिशेने येणारी वाहतूक बंद करण्याची मागणी-
सध्या महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे या परिसरातील वाहतूक सेवा रस्त्याने सुरू आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते.तसेच या परिसरात ट्रान्सपोर्ट,विविध प्रकारची गोदामे, शोरूम आहेत. त्यामुळे लांबून फिरून जाण्यापेक्षा वाहने उलट्या दिशेने चुकीच्या पद्धतीने येतात.त्यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे.त्यामुळे हा अपघात घडला आहे.जीव मुठीत धरून याठिकाणी वाहनधारकांची ये-जा सुरू आहे.एखादी मोठी घटना घडण्याआधी शिरोली एमआयडीसी वाहतूक पोलिसांनी वेळीच उलट्या दिशेने येणारी वाहतूक बंद करून वाहतुकीला शिस्त लावावी अशी मागणी वाहनधारक,स्थानिक नागरिकांतून होत आहे.
Comments
Post a Comment