छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या कार्याला यश मेढा, कुसुंबी ते बामणोली बस सेवा चालू.

 छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या कार्याला यश मेढा, कुसुंबी ते बामणोली  बस सेवा चालू.

--------------------------------------

 सातारा  प्रतिनिधी

 शेखर जाधव

--------------------------------------

/जावली :-मेढा ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे बाजार घेण्यासाठीव शिक्षण 

घेण्यासाठी मेढा जाणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच नोकरदार मंडळी, बाजारासाठी जाणारे ग्रामस्थ प्रवास करतात. मेढा ,कुसुंबी, कोरघळ, अंधारी ,कास बामणोली

इत्यादी गावातील प्रवासी व विद्यार्थी प्रवास करत असतात. ही सर्व गावे मेढा, कास, बामणोली मुख्य रस्त्यापासून जवळजवळ एक ते दोन किलोमीटरच्या परिसरात आहेत. त्या मार्गाच्या परिसरात जंगल असल्याने या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर ज्यास्त प्रमाणात असल्यामुळे एसटी  नसल्याने कधी कधी या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी रात्रीची कसरत करावी लागत आहेत. मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात  वन्य प्राण्यांच्या भीतीने विद्यार्थी भीतभीत आपल्या घरी पोहचत आहेत. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे  असेच जर चालू राहिले तर हे शिक्षणच नको असं मत काही मुलींचे पालक व्यक्त करत होते या मार्गावर बसेस चालु करण्यासाठी 

छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री तानाजी कीर्दत व त्यांचे सहकारी श्रीकांत सावंत श्री शेखर जाधव पत्रकार व सल्लागार महाराष्ट्र राज्य छत्रपती संकटना महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाराकाराने व पाठपुराव्याने सौ नीता बाबर व्यवस्थापक यांना वेळोवेळी पाठपुरावा लेटर द्वारे एसटी चालू करणे बद्दल पाठपुरावा करत अखेर मेढा ते बामणोली  एसटी चालू करण्यात आली त्याबद्दल सौ.नीता बाबर व्यवस्थापक श्री अजित मुगडे स्थानक प्रमुख ,सागर तरडे, प्रवीण पवार, अंकुश पवार, अमर पवार, सिताराम मोहिते, (वाहतूक निमंत्रक) तसेच चालक विजय चव्हाण, सचिन सुतार ,या सर्व टीमचे छत्रपती संघटना यांच्यातर्फे व सर्व कास बामनोली कुसुंबी,  कोरघळ ,अंधारी ,ग्रामस्थांकडून एसटी महामंडळाचे आभार मानले जात आहेत व ही एसटी व सेवा अशीच पूर्वरत चालू ठेवा अशी अपेक्षा करतात

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.