बारा वर्षाच्या शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार.मुंबईमधील घटना.

 बारा वर्षाच्या शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार.मुंबईमधील घटना.


---------------------------------------

मुंबई प्रतिनिधी

---------------------------------------

महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरून जात असताना सातत्याने रोज अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामधील बलात्काराची घटना ताजी असतानाच मुंबईत एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबईमध्ये १२ वर्षांच्या शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली असून यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे.


या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी तिच्या काका आणि  कुटुंबासह राहात होती. २४ फेब्रुवारीला शाळा सुटल्यापासून ती मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. २६ फेब्रुवारीला मुलीच्या काकांनी मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात केली. त्यानंतर २७ तारखेच्या सकाळी ही पीडित मुलगी घाबरलेल्या अवस्थेत दादर रेल्वे स्थानकाजवळ दादरच्या पोलिसांना आढळली. 

संशयास्पद आणि घाबरलेल्या अवस्थेत ही मुलगी रेल्वे स्टेशनवर फिरत होती.  १२ वर्षांच्या मुलीचं अपहरण झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही मुलीला ताब्यात घेऊन तिला पोलीस स्टेशनकडे सोपवलं. पोलिसांनी केलेल्या चौकशीत या मुलीने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगितले. 


जोगेश्वरी पोलिसांनी घेतले पाच जणांना ताब्यात.


पिडित मुलची हकिकत ऐकून 

दादर रेल्वे पोलिसांनी तातडीने जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क साधला, पीडित मुलीच्या जवाबानंतर आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि पोस्को कायदा अंतर्गत पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर जोगेश्वरी पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या पाचही आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी हे एसी मेकॅनिक आहेत. 


पोलिसांनी दिलेली माहिती अशी की 

पीडित मुलगी तिच्या काकांसोबत मुंबईतील जोगेश्वरी परिसरामध्ये राहते. पीडित मुलीचे काका ड्रायव्हर आहेत. २४ फेब्रुवारी रोजी शाळा सुटल्यानंतर पीडित मुलगी शाळेतून उशीरा घरी आली होती. त्यामुळे तिचे काका तिच्यावर रागावले होते. त्याच रागातून मुलगी घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती जोगेश्वरी स्थानकावर आली जिथे तिची एका मुलाशी भेट झाली जो तिला घेऊन वांद्रे बस स्टँडला गेला. त्यानंतर पीडितेला आणखी पाच तरुण भेटले जे तिला मरीन ड्राइव्ह आणि नंतर संजय नगर येथे घेऊन गेले. याच ठिकाणी आरोपींनी मुलीवर आळीपाळीने अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी सकाळी, सर्व आरोपी कामावर गेले असताना मुलीने आपली सुटका करून घेत घर सोडलं आणि दादर स्टेशन गाठलं.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.