महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सांगवडे मध्ये 134 वी जयंती उत्साहात साजरी.

 महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची सांगवडे मध्ये 134 वी जयंती उत्साहात साजरी.

----------------------------------------

सांगवडे प्रतिनिधी

 विजय कांबळे 

----------------------------------------

सांगवडे प्रतिनिधी - सांगवडे मध्ये महामानव, बोधिसत्व, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव महिलांनी रात्री 12 वाजता पाळणा म्हणून सुरुवात केली. व सकाळी माणगाव वरून सांगवडे पर्यंत ज्योत आणतेवेळी बाबासाहेबांच्या घोषणा देत संपूर्ण गावातून फेरी मारून उत्साहात ज्योतीचे आगमन झाले.

    त्यानंतर समाजातील अध्यक्ष श्री धर्मेंद्र यादव यांच्या हस्ते झेंड्याचे पूजन करून झेंडावंदन करण्यात आले. तसेच गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ रुपाली कुंभार व समाजातील व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार व बुद्ध प्रतिमेला फुले वाहून विनम्र अभिवादन केले. 

   तसेच समाजातील कु. संध्या कांबळे, कु.तनिष्क जाधव व कु.श्रद्धा यादव यांनी बाबासाहेबांच्या जीवनावरती छोटे-मोठे भाषण करून त्यांच्या विषयी छान माहिती सांगितली.

   यावेळी गावचे सरपंच सौ रूपाली कुंभार, ग्रामपंचायत सर्व सदस्य, समाजाचे अध्यक्ष धर्मेंद्र यादव, सर्व कमिटी बॉडी व समाजातील बंधू, भगिनी, प्रतिष्ठित नागरिक, सर्व माजी सरपंच, पोलीस पाटील, गावातील संस्थेचे पदाधिकारी व युवा पिढी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमासाठी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे चांगले सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पिंकू जिरगे यांनी केले.

  तसेच दिनांक 15 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 3 भोजनदान कार्यक्रम व संध्याकाळी 6 वाजता भव्य अशी मिरवणूक नियोजित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.