मुरगूडमधे रंगणार 30 एप्रिल ते २ मे नामदार चषक कुस्ती स्पर्धा.
मुरगूडमधे रंगणार 30 एप्रिल ते २ मे नामदार चषक कुस्ती स्पर्धा.
--------------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
--------------------------------------
मुरगूड येथे कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्ती असोशिएशन यांच्या मान्यतेने व मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नामदार चषक मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे दि. 30 एप्रिल ते 2 मे रोजी भव्य मॅटवरील कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे खुल्या गटातील विजेत्यास नामदार चषकासह २.५ बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती संयोजक रणजीत सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कुस्ती स्पर्धा कन्या शाळेच्या मैदानावर होणार असून या स्पर्धेचे उद्घाटन गोकुळ दुध संघाचे संचालक नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे हे अध्यक्षस्थानी असणार आहेत मैदान पूजन विश्वास पाटील तर स्पर्धेचे बक्षीस वितरण२ मे रोजी केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आम. सुनिल शेळके यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
खुल्या गटासाठी नामदार चषक ठेवण्यात आला असून पहिल्या खुल्पा गटातील पहिल्या यार विजेत्यांना ६ लाखाची रोख बक्षीसे व चषक देण्यात येणार आहे.५७ किलो गटासाठी पै. आनंदा मांगले युवा चषक व रोख रक्कम ४६ किलोसाठी कुमार चषक व रोख रक्कम देण्यात येणार आहे. खुला गट सोडून ७४,६५,६९,५७,५२,४६,४२,३५,३०,२५,२२ या वजनी गटात स्पर्धा पार पडणार आहेत.
पत्रकार परिषदेस नामदेव भांडीगरे, वस्ताद आणणासो गोधडे, राजू आमते, डॉ. सुनिल चौगले, युवराज सुर्यवंशी, रवि परीट, नंदकिशोर खराडे, लक्ष्मण मेंडके, सचिन मादूम, रणजीत मगदूम, सचिन शिंदे, सत्यजित यौगले, अमीत तोरशे, बाळकृष्ण मंडलिक, संग्राम भोसले, अविनाश परीट, अमर नाधवडेकर, नितीन कांबळे, अमर सारंग आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment