जोतिबा डोंगरावर घडलेल्या खुन हा अवैध्य संबंधातून झाल्याचे स्पष्ट,48 तासात आरोपी गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश.

 जोतिबा डोंगरावर घडलेल्या खुन हा अवैध्य संबंधातून झाल्याचे स्पष्ट,48 तासात आरोपी गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश.

-----------------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार.

-----------------------------------

शनिवार दिनांक 19/04/2025 रोजी 2.30मि.सुमारास  वाडी रत्नागीरी ता. पन्हाळा गिरोली ते जोतिबा मंदीर जाणाऱ्या रोडवर असलेल्या राजाराम सातार्डेकर यांच्या गवत पड जमिनीमध्ये असणाऱ्या पाय  वाटेवर एका अनोळखी पुरुषाचा व व  अंदाजे 45 ते 50 , त्यांच्या अंगात पांढऱ्या रंगाचा फूल बाहयाचा शर्ट, पायात राखाडी रंगाची पॅन्ट, रंगाने सावळा, गळ्यात केसरी रंगाचा दोरा असून गळयाभोवती दोरी व कमरेस पंचरंगी करदोरा, उंची अंदाजे 5 फूट 5 इंच, नाकास व उजव्या हातचे करंगळीस जखम होवून रक्त येवून सुकलेले, पोटास डावे कमरेजवळ काळे रंगाचा मारहाणीचा वण असलेल्या  अनोळखी इसमाचा कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी मारहाण करुन, दोरीने गळा आवळून खून करुन त्याचे प्रेत सदर ठिकाणी टाकून दिली असल्याची माहीती बाळासाहेब यशवंत पाटील पोलीस पाटील दाणेवाडी तालुका पन्हाळा यांनी कोडोली पोलीस ठाणे दिली होती त्या प्रमाणे कोडोली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 या खुनाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस यानी निरंतर 48 तास 130 सि सि टिव्ही फुटेज तपासत इचलकरंजी जयसिंगपूर मार्गे अथणी कर्नाटक येथून आरोपी राजू भिमाप्पा हुलागटी अथणी यास ताब्यात घेऊन त्यांच्या कडे चौकशी केली असता त्याने मयत ईसमाचे नाव आप्पासो शंकर बोरगावे व व 45 रा मोळे ता कागवाड जि बेळगाव असल्याचे सांगितले .

खुनाचे कारणं असे घडले,

-------------------

मयत आप्पासो बोरगावे यांच्या भावांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले होते भावाच्या मृत्यू पच्क्षात भावाची पत्नीशी मयताचे अनैतिक संबंध निर्माण झाले होते नजिकच्या काळात मयताची भावजय व गुन्ह्यातील मुख्य आरोपी शिंदे या दोघांचे प्रेम संबंध निर्माण झाले होते त्या कारणावरून मयत हा भावाच्या पत्नीस मारहाण करून शिवीगाळ व मारहाण करीत होता त्यामुळे  मयताचे भावजय हिने गोडाप्पा शिंदे यास फोन करून आप्पा बोरगाव हा मला मारहाण व शिवीगाळ करून त्रास देत असून त्याचा कायमस्वरूपी काटा काढावा असं सांगीतल्यावर या प्रकरणातील मुख्य आरोपीशी सगणमत करुण मयत आप्पाजी बोरगाव या दिनांक 18 /04/ 2025 रोजी रात्री उगार (कर्नाटक )येथील हॉटेलवर दारू पाजून त्यानंतर आप्पाजी यास ओमनी कार मधून दिनांक 19/0 4 /2019 रोजी पहाटे दोन वाजन्याच्या सुमारास ज्योतिबा ते गिरोली जाणाऱ्या रोडवर असलेल्या यमाई मंदिराच्या पायथ्याजवळ डोंगरावर हात पाय बांधून आणले तसेच त्या ठिकाणी त्याचा गळा आवळून खून केल्याची माहिती दिली त्यानंतर या खुनातील मुख्य आरोपी गौडाप्पा आनंद शिंदे व व  33 राहणार  कागवाड जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक यास त्याच्या राहता घराच्या परिसरामधून ताब्यात घेतले असता त्याने  खून केल्याची कबुली दिली दोन्ही आरोपींना दोन्ही आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले चार चाकी ओमनी कार क्रमांक के ए 22 एम 63 56 ताब्यात घेऊन खुनाच्या पुढील तपासासाठी कोडोली पोलीस ठाण्यास सदर आरोपीस वर्ग केले आहे

सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक . महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक , निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. बी धीरज कुमार, उप विभागीय पोलीस अधिकारी शाहुवाडी विभाग  आप्पासो पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक . रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, तसेच पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे, सुरेश पाटील, रोहीत मर्दाने, राजु कांबळे, रुपेश माने, राम कोळी, वसंत पिंगळे, सतिश जंगम, बालाजी पाटील, कृष्णात पिंगळे, प्रशांत कांबळे, अरविंद पाटील, अमित सर्जे, हंबीर अतिग्रे यांनी केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.