दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या यात्रेसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर आणि कर्नाटक , आंध्रप्रदेश राज्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे
दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या यात्रेसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर आणि कर्नाटक , आंध्रप्रदेश राज्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे
. चैत्र महिन्यात उन्हाच्या झळा जानवत होत्या व अंगाची लाही- लाही होत होती म्हणून श्रीसत्यसाई सेवा संघटना कोल्हापूर यांच्यावतीने यात्रेसाठी आलेल्या सुमारे दहा हजार भाविकांची तहान ही थंडगार मसाले ताकांचे वापट करून भागिवली यासाठी दोन हजार लिटर ताक लागले.
जोतिबाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक आले आहेत अनेक भाविक सासनकाठी नाचवत व गुलालाची उधळण करत होते "जोतिबाच्या नावानं चांगभलंsss" या गजरात हा परिसर दुमदुमला. मानव सेवा ही ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्याप्रमाणे कार्य करणाऱ्या श्रीसत्यसाई सेवा संघटना कोल्हापूर यांच्यावतीने व संघटनेचे राष्ट्रीय आध्यात्मिक प्रमुख मुरली जाजू व राज्याध्यक्ष धर्मेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली जोतिबा डोंगरावर थंडगार मसाले ताकांचे वाटप करण्यात आले. दरम्यान प्लास्टिक मुक्त यात्रा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले त्याला प्रतिसाद देत संघटनेने ताक वाटप करण्यासाठी आणलेले प्लास्टिक ग्लास गोळा केला .
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बजरंग माळी, जिल्हा सेवादल प्रमुख दत्तात्रय पाटील , जिल्हायुथ प्रमुख बच्चन लव्हटे, आशिष बुचडे ,बिपीन बोरकर, आशिष बुचडे, सुलभा माळी ललिता पाटील, तानाजी पाटील, धनाजी गुरव, चंद्रकांत वाळवेकर, कृष्णात जाधव अनिल मोळे, आण्णासो पाटील प्रकाश खोत आदीसह शंभर साईसेवकांनी उत्फुर्तपणे सेवा केली.विनोद शिंगे कुंभोज
फोटोओळ -- थंडगार ताक पिण्यासाठी भाविकांची झालेली गर्दी
Comments
Post a Comment