पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा हातकणंगले शिंदे शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध.
पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा हातकणंगले शिंदे शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध.
---------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------
जम्मू काश्मिर मधील पहलगाम येथील बैसरन येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध शिवसेना हातकणंगले तालुकाच्या वतीने करीत आहोत. हा हल्ला हिंदू समाज, हिंदू संस्कृतीवर झालेला आहे. हा हल्ला भारतीय संविधानावर झालेला असून या दहशवादी हल्ल्यास केंद्र सरकारने तात्काळ जशास तसे प्रतिउत्तर देवून आंतकवादाचे समुळ उच्चाटन करावे. भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी तसेच गृहमंत्री अमितजी शहा यांच्या पाठीशी शिवसेनेचे मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे आहेत याची नोंद घ्यावी. भारताच्या सैन्य दलामध्ये आतंकवादाचा बिमोड करण्याची ताकद वं क्षमता आहे. त्याबद्दल आमच्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. अशा आतंकवादीचा हल्ल्याचा बिमोड करण्यासाठी भारत सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत असे निवेदन देण्यात आले.यावेळी माजी आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर ,शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अविनाश बणगे, पुनम खाडे, भावना पाटील ,सुद्धा चौगुले,सुशीला पाटील, हातकणंगले तालुका अध्यक्ष अजित सुतार, युवा अध्यक्ष निशिकांत पाटील तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हातकणंगले तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना निवेदन देण्यात आले. विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment