परळी भागात वन्य प्राण्यांचा उपद्रवाला कंटाळून शेतकरी हवालदील.
परळी भागात वन्य प्राण्यांचा उपद्रवाला कंटाळून शेतकरी हवालदील.
-------------------------------
सातारा प्रतिनिधी
अमर इंदलकर
-------------------------------
परळी भागात रानटी डुक्कर, भेकर, ससे, माकडे, मोर- लांडोर,बिबटे,हरीण, यांचा वावर अतिजास्त प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांना सुपीक जमीन पडीक ठेवण्यास भाग पाडाव असा वन्यप्राण्यांचा उपद्रव चालला आहे. सालाबाद प्रमाणे ह्याहीवर्षी रानटी डुक्करांनी नुकसान केले--सालाबादप्रमाणे पुन्हा मोरानी उभ पीक उकरून काढलं अशी शोकांतिका शेतकऱ्याच्याकरवी ऐकावयास पाहावयास मिळत आहे. वन्यप्राणी मारण्यावर कायदेशीर कारवाई केली जाते तर शेतकऱ्याच नुकसानच होऊ नये म्हणून काय कारवाई केली जाते? असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत! वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीकरिता शासनाची तोकडी भरपाई काय कामाची? बी- बियानांना झालेला खर्चदेखील त्यातून वसुल होत नसतो असा सवाल हवालदील झालेला शेतकरी करत असताना पाहायला मिळत आहे. सदर वन्य क्षेत्र हे बफर झोन घोषित करून तार कंपाउंडची तजवीज शासनाने करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. परळी भागात याहीअगोदर खूप मोर्चे खूप प्रमाणात ह्या विषयास अनुषंगून झाले असून खूप पुष्कळ बातम्या लागलेल्या आहेत परंतु ठोस उपाय योजना काहीही झालेल्या नसल्याचे वीदीर्ण चित्र आजतागायत पाहायला मिळत आहे.
Comments
Post a Comment