महसूलची डोळेझाक!; सांगलीत कृष्णा नदीतून बेमाप वाळू उपसा.

 महसूलची डोळेझाक!; सांगलीत कृष्णा नदीतून बेमाप वाळू उपसा.

----------------------------

 मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम

----------------------------

 मिरज : राज्यात सर्वत्र नदीतून वाळूउपशावर निर्बंध असताना कृष्णा नदी मात्र नियमाला अपवाद ठरली आहे. कृष्णाघाटावर कृष्णेतून बेबंदपणे वाळू उपसा सुरू आहे. या उपशाला महसूल प्रशासनाने रीतसर परवाना दिला आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे.


कृष्णाघाटावर अर्जुनवाड (जि. कोल्हापूर) गावाच्या हद्दीत वाळू उपशासाठी औटी तयार करण्यात आली आहे. नदीतून बोटीद्वारे उपसा करून वाळू बाहेर काढली जात आहे.


कृष्णा नदीच्या उगमापासून महाराष्ट्र हद्दीत कोठेही वाळूउपशाला परवानगी नाही. शासनाने वाळूचे लिलाव अद्याप सुरू केलेले नाहीत. गेल्या सुमारे सहा-सात वर्षांपासून वाळू उपसा बंद असल्याने बांधकामांसाठी कृत्रिम वाळूचा वापर सुरु झाला आहे. मात्र काही घरमालक व बांधकाम ठेकेदार वाळूच्याच वापरावर ठाम असतात. त्यांच्यासाठी चोरट्या पद्धतीने वाळूउपसा केला जात आहे. वाट्टेल त्या किमतीला या वाळूची विक्री व खरेदी होते.


वाळूतस्करांच्या या कृत्यामुळे कृष्णेची ओरबड सुरू आहे. राजरोस, भरदिवसा औटी तयार करून वाळूचा उपसा सुरू असतानाही स्थानिक तलाठी व महसूल प्रशासन शांत कसे? हा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. या कामावर चौकशी केली असता मातीच्या उपशासाठी औटी केल्याचे सांगण्यात आले, प्रत्यक्षात मात्र वाळूचाच उपसा सुरू असल्याचे दिसून आले. उपसलेली वाळू ट्रॅक्टरमधून भरून विक्रीसाठी नेली जात होती..



🌟 हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड, कोल्हापूर तर्फे आयोजित 🌟

🏠 'घरौदा' वसतीगृह तथा पुनर्वसन केंद्र, २२३/६, अ शांतीनगर, हुपरी रोड, उंचगाव (पूर्व), ता. करवीर, जि. कोल्हापूर


🔷 व्यवसाय प्रशिक्षण नोंदणी शिबीर

📅 दि. 26 एप्रिल 2025, शनिवार

🕚 सकाळी 11.00 वा.

📍 'घरौदा' वसतीगृह, उंचगाव

🍽 भोजन व्यवस्था उपलब्ध


🔷 दिव्यांग वधू-वर मेळावा

📅 दि. 27 एप्रिल 2025, रविवार

🕙 सकाळी 10.00 वा.

📍 'घरौदा' वसतीगृह, उंचगाव

👩🦽👨🦽 सर्व प्रकारच्या दिव्यांग वधू-वरांसाठी

📝 नोंदणी अंतिम दिनांक: 20 एप्रिल 2025

🍽 भोजन व्यवस्था उपलब्ध


📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:संपर्क क्र.7499980409

हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड, कोल्हापूर


Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.