अतिक्रमित जागा वाढवून देण्यास नकार दिल्याने लोकनियुक्त सरपंचास मारहाण ग्रामपंचायत सदस्यासह चार जणांवर गुन्हा दाखल.
अतिक्रमित जागा वाढवून देण्यास नकार दिल्याने लोकनियुक्त सरपंचास मारहाण ग्रामपंचायत सदस्यासह चार जणांवर गुन्हा दाखल.
-----------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-----------------------------------
गांधीनगर:- अतिक्रमित जागा वाढवून ती कायम करण्यास नकार दिल्याच्या रागातून लोकनियुक्त सरपंच संदीप हिंदुराव पाटोळे (वय 46) रा. गांधीनगर यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी अविनाश हेगडे, सोनाली हेगडे, शोभा हेगडे, रीना अभिजीत अवघडे, अभिजीत अरुण अवघडे (सर्व राहणार कोयना कॉलनी गांधीनगर ता. करवीर) यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी गेल्या आर्थिक वर्षात चांगले काम केल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम ग्रामपंचायत मध्ये सुरू होता. त्यादरम्यान अविनाश हेगडे, शोभा, हेगडेआणि सोनाली हेगडे यांनी आपल्या दारात पाण्याची टॉकी बसवू नये अशी भूमिका घेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच ग्रामपंचायत सदस्य रीना अवघडे व अभिजीत अवघडे यांनी अतिक्रमित जागा वाढवून ती कायम करण्यासाठी धमकावले तसेच त्याला विरोध केला असता अरे तुरेची भाषा करत शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. या कारणावरून गांधीनगर पोलीस ठाण्यात ग्रामपंचायत सदस्यांसह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद सरपंच संदीप हिंदुराव पाटोळे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीधर सावंत करीत आहेत.
🌟 हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड, कोल्हापूर तर्फे आयोजित 🌟
🏠 'घरौदा' वसतीगृह तथा पुनर्वसन केंद्र, २२३/६, अ शांतीनगर, हुपरी रोड, उंचगाव (पूर्व), ता. करवीर, जि. कोल्हापूर
🔷 व्यवसाय प्रशिक्षण नोंदणी शिबीर
📅 दि. 26 एप्रिल 2025, शनिवार
🕚 सकाळी 11.00 वा.
📍 'घरौदा' वसतीगृह, उंचगाव
🍽 भोजन व्यवस्था उपलब्ध
🔷 दिव्यांग वधू-वर मेळावा
📅 दि. 27 एप्रिल 2025, रविवार
🕙 सकाळी 10.00 वा.
📍 'घरौदा' वसतीगृह, उंचगाव
👩🦽👨🦽 सर्व प्रकारच्या दिव्यांग वधू-वरांसाठी
📝 नोंदणी अंतिम दिनांक: 20 एप्रिल 2025
🍽 भोजन व्यवस्था उपलब्ध
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:संपर्क क्र.7499980409
हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड, कोल्हापूर
Comments
Post a Comment