ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या शिक्षकांचा गौरव सोहळा बांबवडे येथे संपन्न.
ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या शिक्षकांचा गौरव सोहळा बांबवडे येथे संपन्न.
-----------------------------------
शाहुवाडी प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
-----------------------------------
शाहुवाडी :विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया घालणाऱ्या शिक्षकांचा गौरव करताना सामाजिक बांधिलकीची जाणीव जोपासणारा एक प्रेरणादायी सोहळा बांबवडे येथे पार पडला. श्री. डी. आर. पाटील शाहुवाडी तालुका प्राथमिक शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्था मर्या., बांबवडे यांच्या वतीने एन.एम.एम.एस., नवोदय व व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन करून उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
तसेच या गौरव सोहळ्यात श्री. विक्रम पाटील सर, श्री. दिग्विजय कुंभार सर, सदाशिव थोरात साहेब, मारुती जाधव सर, जमीर सय्यद सर व सौ.उज्वला चौगुले मॅडम यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पेरत शिक्षणाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या परिश्रमामुळे व प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थी नव्या उंचीवर पोहोचले आहेत.
सत्कार सोहळ्याच्या वेळी संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री. दिनकर पाटील सर, चेअरमन श्री. दत्तात्रय पाटील सर, व्हा. चेअरमन श्री. विठ्ठल धायतडक सर, श्री. सर्जेराव पोवार साहेब, श्री. प्रदीप पाटील सर, श्री. बाळासाहेब सनगर सर, श्री. चंद्रकांत मुगडे सर, श्री. अशोक पाटील सर, सौ. सुमन काळे मॅडम, क्लार्क श्री. राजाराम पाटील सर आणि उमेश बोरगे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत मुगडे सर यांनी केलं. तर आभारप्रदर्शन विठ्ठल धायतडक सर यांनी अत्यंत मनापासून व्यक्त करत सर्व शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हा सत्कार सोहळा म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाला दिलेला सलाम होता. या उपक्रमातून शिक्षकांना नवे बळ व प्रेरणा मिळाली असून, शिक्षण क्षेत्रातील उत्क्रांतीसाठी अशाच प्रकारच्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सर्व मान्यवरांनी आवर्जून नमूद केले.
Comments
Post a Comment