कोरपना तालुक्यात अवैध्य वाळू वाहतूक जोमात महसूल विभाग कोमात.

कोरपना तालुक्यात अवैध्य  वाळू वाहतूक जोमात महसूल विभाग कोमात.

--------------------------------------- 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 मंगेश तिखट  

--------------------------------------- 

कोरपणा तालुक्यात पैनगंगा नदी वर वनोजा, झोटिंग, कोडशी खु,कोडशी बू,जेवरा,अकोला ,कोठोडा रायपूर,घाटावर मोठ्या प्रमाणात रेती साठा आहे. शासनाकडून रेती घाटाचा लिलाव झाला नसल्यामुळे रेती चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे .शासनाच्या रेती बाबत उदासिन धोरणामुळे घरकुल लाभार्थ्यांचे तसेंच सर्वसाधारण घर बांधणाऱ्याचे स्वप्न पूर्ण होईल का  ? प्रती ब्रास एक टॅक्ट्रर सहा ते सात हजार भाव कोरपणा शहर, रूपापेठ ,दुर्गाडी,मांडवा ,चनई ,खडकी,कन्हाळगाव,धानोली ,पिपर्डा,नारांडा,पिपरी, तालुक्यात सर्वच गावात रेतीचा भाव .रेती घाट लिलाव नसताना तालुक्यात भरपूर रेती उपलब्ध होत आहे तसेंच काही ठिकाणी अवैद्य रेती साठे असल्याचे एकवण्यात येत आहे.कोरपणा महसूल विभागात तहसीलदार एक,नायब तहसीलदार तीन,मंडळ अधिकारी चार,तलाठी एकवीस,कोतवाल नऊ,कार्यरत आहे गेल्या एक दीड महिन्यापासून कोरपणा तालुक्यात इतक्या मोठया प्रमाणात अवैद्य रेतीची राजरोष पणे वाहतूक नदी घाटावरून होत आहे.या चोरट्या रेती वाह्तुकिला बळ कुणाचे राजकीय , की प्रशासकीय .कोरपणा तालुक्यात ट्रॅक्टर ची संख्या झपाट्याने वाढत आहे. दोन महिन्यापूर्वी आय.ए.एस तहसीलदार कार्यरत असताना अवैद्य रेती वाहतूकिला आळा बसला होत मात्र एक दीड महिन्यापासून अवैद्य रेतीवाहतुकीचा सपाटा सुरु आहे . रेती घाटावरून दिवसभर रेतीचा साठा करायचा रात्रीच्या वेळी वाहतूक ही  रेतीची अवैद्य वाहतूक  रेती माफीयाच्या मधुर समंधातून त होत नाही का? अवैद्य रेती वाहतूक दाराणा राजकीय पाठबल मिळून प्रशासणावर दबाव येत आहे का? मात्र सरकारचा लाखोचा महसूल बुडत आहे.सर्व सामान्य जनतेचे रेतीमुळे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही.. महसूल विभागाच्या साथीला पोलीस विभाग आहे .मात्र पोलीस विभागातील काही पोलीस कर्मचाऱ्याच्या  अवैद्य रेती वाहतूकिला आशीर्वाद आहे यांचे ट्रॅक्टर अवैद्य रेतीची  वाहतूक ताफ्यात सामील असल्याची परिसरात चर्चा आहे .त्यातच नदी घाटावरुन रेतिचा साठा गावा शेजारी होतो मात्र पोलिसाचा सखा भाऊ पोलीस पाटील  गप्प . महसूल ,पोलीस विभाग शंभर अधिकारी कर्मचारी कार्यरत असताना  इतक्या मोठ्या प्रमाणात अवैद्य रेतीची वाहतूक होत आहे आळा खालण्याची जबाबदारी सर्वसामान्य जनतेचि नाही .प्रशासकीय अधिकाऱ्या ची आहे. कोरपणा तहसील कार्यालयातील  सर्वसामान्य जनतेची  कामे  कामे वेळेवर होत नाही त्यामुळे कोरपणा तालुक्यातील जनता त्रस्त आहे. मा.  जिल्हाधिकारी साहेब तसेंच जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी कोरपणा तालुक्यातील अवैद्य  रेती वाहतूक इतर धंद्यावर लगाम लावावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.