वळीवडेत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ११ बकरी ठार ३ गंभीर ५ बेपत्ता.

 वळीवडेत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ११ बकरी ठार ३ गंभीर ५ बेपत्ता.

गांधीनगर:-  तरससदृश्य वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात वळीवडे येथील मेंढपाळ गुंडाप्पा आण्णाप्पा शेळके, यांची ११ बकरी ठार तर ३ गंभीर जखमी होऊन ५ बेपत्ता झाली आहेत.हा हल्ला शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झाला. या घटनेमुळे मेंढपाळाचे दोन लाख रुपयांचे  आर्थिक  नुकसान झाले.

       याबाबत माहिती अशी कि गुंडा शेळके, शामराव शेळके, तानाजी शेळके, अशोक शेळके, धुळा जोंग, बबन कांडगावे, रा. वळीवडे, या मेंढपाळांचा सहाशे मेंढ्यांचा कळप वळीवडे येथील शेतकरी  शिवाजी जगताप यांच्या  (दंडवतेची शेरी)  शेतामध्ये आठवडाभरापासून खतासाठी  बसवल्या होत्या . दरम्यान मेंढर चारण्यासाठी मेंढपाळ मेंढे घेऊन अन्य ठिकाणी गेले होते. तळावर असणाऱ्या लहान कोकरावर शुक्रवारी दि. २५  रोजी  सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वनप्राण्यांनी मेंढराच्या तळावर  हल्ला केला. या हल्ल्यात तारेच्या कुंपणात ठेवलेली ११ मेंढ्यांची कोकरे ठार व ३ गंभीर जखमी तसेच ५ बेपत्ता झाली आहेत.  हल्ल्याची घटना  मेंढपाळ गुंडा शेळके यांनी यशवंत क्रांती संघटनेचे  कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस राम कोळेकर यांच्या मार्फत यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, यांना कळवले.  संजय वाघमोडे यांनी  हि घटना तात्काळ वनविभाग व पशुसंवर्धन अधिकारी यांना कळवून घटना स्थळी अधिकाऱ्यांसह उपस्थित राहून पंचनामा करण्याची विनंती केली. 

      वनपाल शैलेश शेवडे,वनरक्षक ओंकार भोसले, वनसेवक गजानन मगदूम, यांनी घटनास्थळी उपस्थित राहून घटनेचा पंचनामा केला. डॉ. प्रमोद लोखंडे, पशुधन  विकास अधिकारी, डाँ. शशिकांत काटकर, पशुधन पर्यवेक्षक करवीर, प्रकाश नाईक ड्रेसर, यांनी मृत कोकरांचे शवविच्छेदन व जखमी वर उपचार केले. 

   यावेळी पोलीस पाटील दीपक पासाना,  संजय वाघमोडे  राम कोळेकर, विजय रानगे बाबुराव खिलारे, सजन रेवडे , अशोक शेळके, धुळा जोंग, गणेश कोळेकर , किरण शेळके , बबन कांडगावे , शामराव शेळके ,

तानाजी शेळके , दिलीप शेळके, कुमार शेळके, संतोष शेळके यांच्यासह यशवंत संघटनेचे तालुक्यातील पदाधिकारी मेंढपाळ घटनास्थळी स्थळी उपस्थित होते. 


फोटो ओळ -: वळीवडे ता.करवीर येथे कोकऱ्यांच्या कळपावर तरसदृश्य वन्य प्राण्यांने हल्ला केला. त्यामध्ये अकरा कोकरे ठार झाले. त्यामध्ये मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले. याचा पंचनामा करण्यात आला यावेळी यशवंत सेनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे सह मेंढपाळ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.