अवैधरीत्या लाकडाची विनापरवाना वाहतुक करणाऱ्यांना वन परिक्षेत्र पेंडाखळे यांचा जोराचा दणका.

 अवैधरीत्या लाकडाची विनापरवाना वाहतुक करणाऱ्यांना  वन परिक्षेत्र पेंडाखळे यांचा जोराचा दणका.

-------------------------------------

शाहुवाडी तालुका प्रतिनिधी  

आनंदा तेलवणकर

---------------------------------------


 शाहुवाडी : - अणुस्कुरा  येथे अवैधरीत्या लाकडाची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी एकावर कारवाई करण्यात आली असून, लाकडासह वाहतूक करणारे वाहन जप्त केले आहे.

            अणुस्कुरा  येथे रात्र गस्त  फिरती तपासणी करीत असता खापणे  वय ५५ वर्षे  रा.माळवाडी ता.पन्हाळा जि.कोल्हापूर हे आयशर टेंपोमधून ( एमएच 10 झेड  ११४९ ) या गाडीतून साग प्रजातींचे अनगड – ७३ नग ,आंबा ३ नग व ऐन प्रजातीचा १ नग असा  असे एकुण ७७ नग लाकूडमाल विनापरवाना वृक्षतोड करून वाहतूक करताना पकडला. त्यानुसार अवैध वृक्षतोड व वाहतूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियमाचे उल्लंघन झाल्याने वनरक्षक ज्ञानेश्वर शिंदे व वनरक्षक अनुस्कूरा यांनी अवैध वृक्षतोड व विनापरवाना वाहतुकीचा वन गुन्हा नोंद केला आहे. जप्त मुद्देमालासह वाहन जप्त करून मोसम मध्यवर्ती रोपवाटीकेत सुरशित ठेवणेत आले आहे . सदर गुन्ह्याचा  तपास जी. गुरुप्रसाद उपवनसंरक्षकसो कोल्हापूर व कमलेश पाटील सहा. वनसंरक्षकसो कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली  श्रीमती- सुषमा जाधव वनक्षेत्रपाल पेंडाखळे, दिलीप आरेकर वनपाल  सावर्डी, श्री- जालीदर कांबळे  वनरक्षकबुरंबाळ, अनिकेत पाटील वनरक्षक मरळे शासकिय वाहन चालक संदिप कदम तसेच कायम वनमजूर नाथा विचारे , राजाराम राऊत, बंडा पाटील, बाळू पाटील , उपस्थित होते. R.R टीम ही या कार्यवाहीत होती

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.