मलकापूर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून मलकापूर एस.टी आगारास पहिल्या टप्प्यात नवीन आलेल्या ५ एस.टी बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत पार पडला.

 मलकापूर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून मलकापूर एस.टी आगारास पहिल्या टप्प्यात नवीन आलेल्या ५ एस.टी बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत पार पडला.

------------------------------------- 

शाहुवाडी प्रीतिनिधी 

 आनंदा तेलवणकर

------------------------------------- 

शाहुवाडी :पहिल्या टप्प्यात नवीन आलेल्या ५ एस.टी बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच मलकापूर एस.टी आगाराचे जेष्ठ कर्मचारी श्री.संजय सावंत रा.मलकापूर यांच्या शुभहस्ते नारळ फोडून नागरिकांच्या सेवेसाठी नविन एस.टी बसेस सुपूर्द केल्या.


तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून मलकापूर एस.टी आगारासाठी एकूण १० नवीन बसेस मंजूर केल्या आहेत. त्यापैकी आज पहिल्या टप्प्यात ५ बसेसचे लोकार्पण करण्यात आले असून उर्वरित ५ बसेस लवकरच आगारात दाखल होणार असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील,भाई भारत पाटील,महादेव पाटील (आण्णा),विष्णू पाटील,रंगराव खोपडे,विजय बोरगे पैलवान,शामराव पाटील,बबन पाटील,युवराज काटकर,अमोल केसरकर,दिलीप पाटील,विष्णू यादव,कोल्हापूर विभाग नियंत्रण प्रमुख शिवराज जाधव,मलकापूर आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांच्यासह एसटीचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.