सांगलीत उद्या आमदारांची झोप उडवणार प्रशासन सज्ज.
सांगलीत उद्या आमदारांची झोप उडवणार प्रशासन सज्ज.
-------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
-------------------------------------
शेतकरी कर्ज माफी व शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव साठी 11 एप्रिल रात्री 12 वाजता माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या घरा समोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने टेंभा (मशाल) आंदोलन.
महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी सर्व पक्षीय आमदार महोदयांनी त्या त्या निवडणुक जाहीरनामा मध्ये शेतकरी कर्ज माफी करु शेतकरी मालाला हमी भाव देऊ असे मोठमोठे आश्वासन दिले होते. अजुनही कर्ज माफी झाली नाही. शेतकऱ्यांच्या कर्ज माफी साठी प्रत्येक आमदारानी सभागृहात आवाज उठवण्यासाठी पुर्ण महाराष्ट्र भर मशाल टेंभा राज्यव्यापी आंदोलन प्रत्येक आमदारांच्या घरासमोर करण्यात येणार आहे. असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री मा ना बचु भाऊ कडु यांनी सरकारला दिला आहे सांगलीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मा. सुरेश भाऊ खाडे यांच्या घरासमोर दि11/4/2025 रोजी रात्री 12 वाजता टेंभा मसाला आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे असे निवेदन पोलीस सांगली शहर पोलीस स्टेशन आणि सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय यांना संघटनेच्या वतीने पत्र देण्यात आले आहे.
सांगली जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ सुतार, सांगली जिल्हा युवक अध्यक्ष ओम भोसले, मिरज तालुका अध्यक्ष पोपट माने, तालुका युवक अध्यक्ष राजू कदम, शिवराज पाटील, व आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
Comments
Post a Comment