जनता दरबाराच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाचे मॉडेल यशस्वी करणार ; युवासेना निरीक्षक ॲड.वीरेंद्र मंडलिक.युवा सेनेच्या जनता दरबारास उत्साही प्रतिसाद
जनता दरबाराच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाचे मॉडेल यशस्वी करणार ; युवासेना निरीक्षक ॲड.वीरेंद्र मंडलिक.युवा सेनेच्या जनता दरबारास उत्साही प्रतिसाद.
--------------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
--------------------------------------
" सत्ता असो वा नसो मंडलिक गटाने सर्वसामान्यांच्या विकासाचे व्हिजन घेऊन काम केले.यापुढे जनता दरबार च्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या विकासाचे मॉडेल यशस्वी करणार." असा निर्धार पश्चिम महाराष्ट्र युवासेनाचे निरीक्षक ॲड.वीरेंद्र मंडलिक यांनी व्यक्त केला.
मुरगूड येथे झालेल्या दुसऱ्या जनता दरबारास तालुक्यातील सुमारे ३० गावच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आपल्या विकासकामांच्या प्रस्तावांच्या सादरीकरणातून उत्साही प्रतिसाद दिला.
अवघ्या महिन्यापूर्वी झालेल्या पहिल्या जनता दरबारात चिमगाव ,मेतके व वंदूर या ग्रामपंचायतीनी मागणी केलेल्या विकास कामासाठी प्रत्येकी २० असा ६० लाखाचा निधी ॲड.मंडलिक यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला. त्याबद्दल या तिन्ही ग्रामपंचायतीच्या वतीने ॲड. मंडलिक यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ॲड.मंडलिक म्हणाले," ६० वर्ष सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी मंडलिक गट जोडला गेला आहे. सत्ता असो वा नसो विकासाची बांधिलकी आम्ही सोडलेली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्री प्रकाश आबिटकर ,माजी खासदार संजय मंडलिक व जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांच्या प्रयत्नातून येत्या चार वर्षात कागल मतदार संघातील १२० गावांसाठी आवश्यक विकास निधी देण्यासाठी प्रयत्नशील राहीन. कार्यकर्त्यांनीही आपल्या गावच्या विकास कामांसाठी पाठपुरावा करावा." अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बी जी पाटील (वंदूर ) ,सरपंच दीपक आंगज (चिमगाव), नारायण मुसळे यांनी मनोगत व्यक्त केली.
अनिल सिद्धेश्वर (कुरणी),दतात्रय मंडलिक, अॅड. राणाप्रताप सासने,सुनिल रनवरे, (मुरगूड), सर्जेराव अवघडे ,संजय करडे (चिमगाव),एन. एस. चौगले(सोनाळी ) ,प्रदिप पाटील (म्हाकवे), बाजीराव कांबळे (बेनिक्रे), सरपंच उतम बैलकर (करंजिवणे),
सरपंच मेघा पाटील (मुगळी), राजवर्धन शेळके, धनाजी पोवार( सोनाळी) , विजय रेपे (चौंडाळ), आदेश पाटील (वाळवे खुर्द), दिपक कुंभार (हळदी)
सुरज सातवेकर (मुरगूड) , उपसरपंच अजित मोरबाळे (शिंदेवाडी)
अरूण मेंडके (मुरगूड),बी. एस. खामकर, ग्रामपंचायत कुरणी, मळगे,खुर्द , बोरवडे, अवचितवाडी ,हणबरवाडी, कुरुकली, आणूर, मांगनूर , बेरडवाडी गावातील लोकप्रतिनिधींनी आपल्या विकास कामांचे प्रस्तावांचे ठराव ॲड. मंडलिक यांच्याकडे सुपूर्द केले.
लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाची मल्ल पै.नंदिनी साळोखे हिचा शिवछत्रपती राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल ॲड.वीरेंद्र मंडलिक व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जनता दरबारात मुरगूडचे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके , माजी उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य साताप्पा कांबळे ,पी.टी. सिरसे , बालाजी फराकटे , मंडलिक कारखान्याचे व्हाईस चेअरमन आनंदराव फराकटे ,संचालक संभाजीराव मोरे , भगवान पाटील, माजी संचालक मसू पाटील , रामचंद्र सांगले, प्रा.एन.एस. चौगले, माजी नगरसेवक शिवाजीराव चौगले,किरण गवाणकर, संदीप कलकुटकी ,दीपक शिंदे , संदिप बोटे , यांच्यासह मंडलिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते .
स्वागत प्रास्ताविक अविनाश चौगले यांनी केले. आभार धिरज सातवेकर यांनी मानले.
Comments
Post a Comment