डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी चबुतरा बांधणी पायाभरणी सोहळा-आमदार अशोकराव माने.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी चबुतरा बांधणी पायाभरणी सोहळा-आमदार अशोकराव माने.
-------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
-------------------------
पट्टणकोडोली ता.हातकणंगले येथे विश्वरत्न,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती निमित्त व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी चबुतरा बांधणी पायाभरणी सोहळा
हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी विश्वरत्न,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी लोकप्रिय आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांनी आपल्या आमदारकीच्या मानधनातील दोन लाखाचा चेक ऍडव्हान्सरुपी पुतळा शिल्पकार आयु सागर सुतार यांचेकडे सुपूर्द केला* व पुढील जयंती च्या पूर्वी सर्व नियमानुसार परवानगी घेऊन पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येईल असे जाहीर केले.
यावेळी सरपंच अमोल बाणदार, पोलीस निरीक्षक नितीन चौखंडे, जेष्ठ नेते प्रकाश पाटील काका, युवा उद्योजक सागर कांबळे,स्वीय सहायक सुहास राजमाने, उद्योजक राजू हुपरे, कृष्णात मसुरकर* रायगोंडा डावरे. माजी सभापती धुळा डावरे, सतीश पुजारी, लक्ष्मण पुजारी, सचिन शिंदे, ग्रा प सदस्य रवी आडके,आनंदा पाटील, सुधाकर पवार, मधुकर पवार, शरद पुजारी, नाना मोठे, सौ रेखाताई डूम, कमल चोपडे, मनीषा रुकडे, गोगा बाणदार,अंबर बनगे,बाबासो कांबळे,RPI आयटीसेल जिल्हाध्यक्ष देवदास कांबळे ,भीमसेन कांबळे ,चरण कांबळे ,अनिल कांबळे राजू आडके' दिपक हालगे ,जयपाल कांबळे ,दीपक भोसले, यासह समस्त बौध्द समाज पुतळा समिती, कार्यकर्ते व भीमसैनिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment