राष्ट्रवादी ओबीसी जिल्हा अध्यक्षपदी सांगवडेचे राजू गुरव यांची निवड.
राष्ट्रवादी ओबीसी जिल्हा अध्यक्षपदी सांगवडेचे राजू गुरव यांची निवड.
.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलचे नुतन जिल्हा अध्यक्ष राजु गुरव यांना निवडीचे पत्र देताना राज्याध्यक्ष कल्याणराव आखाडे सोबत बाबासाहेब पाटील व अनिलराव साळोखे.
----------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सांगवडे प्रतिनिधी
विजय कांबळे
----------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी - कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या ओबीसी सेलच्या जिल्हा (ग्रामीण ) अध्यक्षपदी राजू गुरव सांगवडे यांची निवड करण्यात आली.
कोल्हापूर येथे झालेल्या ओबीसी सेलच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ओबीसी सेलचे राज्याचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांचे हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट ) पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर होते.
महाराष्ट्र राज्याच्या एकुण लोकसंखेचा विचार करता बावन्न ते पंचावन्न टक्के ओबीसी समाज आहे. त्यामध्ये लोहार,सुतार,न्हावी,कासार, तेली,कुंभार,सोनार,कोळी,गुरव,पांचाळ या बरोबर शंभर पेक्षा जास्त जातीचा या मध्ये समावेश असून राजकीय दृष्ट्या महत्वाचा अशा या समाजाचे जिल्हा तालुका ते गाव पातळीवर संघटन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अधीक लक्ष केंद्रित केले आहे. असे मत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना राज्याध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी व्यक्त केले.
मेळाव्यास राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, केडीसीचे संचालक संतोष पाटील,ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, प्रदेश सरचिटणीस विरेंद्र राजमाने,यासीन मुजावर,शिरीष देसाई,निहाल कलावंत,आप्पासाहेब धनवडे,किसनराव चौगले, सांगवडे माजी सरपंच विनायक शिर्के, लोकमत प्रतिनिधी प्रदीप येवारे, आकाश जाधव, A.J फ्रेंड सर्कल, अंकुश चांदणे, निलेश तिरपणकर,अनिकेत चांदणे उपस्थित होते.
Comments
Post a Comment