विनापरवाना तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करणा-या आयोजकांवर शाहुपूरी पोलीसांनी केला गुन्हा दाखल.
विनापरवाना तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करणा-या आयोजकांवर शाहुपूरी पोलीसांनी केला गुन्हा दाखल.
सार्वजनिक ठिकाणी कोणतेही संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करायचे असेल तर त्या कार्यक्रमाची तारीख वेळ व ठिकाण निश्चित करून संबंधित पोलीस ठाण्यास कळवून त्याची परवानगी घेणे आवश्यक असते
शनिवारी नेहमीप्रमाणे रात्री शाहुपुरी रात्री गस्तीच्या पोलीस पथकाला कसबा बावडा येथील मैदानावर तमाशा सुरू असल्याची माहिती मिळाली कसबा बावडा येथील हनुमान सांस्कृतिक मित्र मंडळ तर्फे श्रीराम विकास सेवा सोसायटीचे संचालक धनंजय गोडसे यांनी सदर तमाशाचे विनापरवाना आयोजन केल्याचे पोलीस प्रशासनास दिसून आले त्यावेळी तमाशा पाहण्यासाठी जमलेल्या लोक मोठमोठ्याने एकमेकास मोठ मोठ्याने शिवीगाळ करून धक्काबुक्की करत होते त्यातच श्रीराम विकास सेवा सोसायटीचे कार्य असलेले संचालक धनंजय गोडसे व माजी संचालक सुधीर सदाशिव उलपे यांच्यात लावणी चे गाणे परत लावण्यावरून वाद उफाळून आला होता
शाहुपुरी पोलीसांना शांततेचा भंग करत असल्याचे व विनापरवाना तमाशा चालू असल्याचे आढळून आले त्यामुळे भारतीय न्याय सहिता 2023 चे कलम 223 महाराष्ट्र पोलीस कायदा 110 /117 प्रमाणे पोलीस ठाणे पुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे
Comments
Post a Comment