पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पशुसंवर्धन विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पशुसंवर्धन विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले.

------------------------------------- 

शाहुवाडी प्रतिनिधी 

आनंदा तेलवणकर 

------------------------------------- 

 शाहुवाडी :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतीय इतिहासातील एक तेजस्वी कर्तबगार व दूरदृष्टी असणाऱ्या स्त्रीशक्तीचे प्रतीक आहेत त्यांनी धार्मिक सहिष्णुता समाज कल्याण सार्वजनिक बांधकाम न्यायप्रविष्ठ प्रशासन आणि शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श राज्यकारभाराची उभारणी केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांचे कार्य विचार आणि प्रेरणादायी जीवन गाथा जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आवश्यक आहे त्यास अनुसरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पशुसंवर्धन विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सदर उपक्रमांतर्गत शाहुवाडी तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना करंजफेन कार्यक्षेत्रांतर्गत असणाऱ्या मौजे बर्की येथे वंधत्व निवारण व सर्वोपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये पशुधनाचे जंतनिर्मूलन, गोचीड निर्मूलन, वांझ तपासणी, गर्भधारणा तपासणी, उपचार तसेच व मान्सूनपूर्व लसीकरण करण्यात आले.

सदर शिबिरामध्ये डॉ. ए . बी. कोळी, पशुधन विकास अधिकारी गट- अ, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ करंजफेण यांनी पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली असून यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.