मुरगूडमधे नामदार चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा शानदार शुभारंभ.

 मुरगूडमधे नामदार चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा शानदार शुभारंभ.

-----------------------------------

मुरगूड प्रतिनिधी

 जोतीराम कुंभार

------------------------------------     

      मुरगूड येथे कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्ती असोसिएशनच्या मान्यतेने व मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रतिमापूजन - तहसीलदार अमरदीप वाकडे ,

ध्वजारोहण - प्रांताधिकारी प्रसाद चौगले

दीपप्रज्वलन - केडीसीसी संचालक भैय्या माने , गोकूळ संचालक किसन चौगले , बिद्री साखर संचालक पंडीत केणे , बिद्री साखर उपाध्यक्ष

मनोज फराकटे ,मॅटपूजन - गोकूळ संचालक नविद मुश्रीफ , गोकूळ संचालक अंबरिश घाटगे


यावेळी नविद मुश्रीफ , अंबरिश घाटगे , भैय्या माने , दिग्वीजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले . स्पर्धेत

राज्यातून ४५० मल्ल सहभागी झाले आहेत.


कार्यक्रमास  सुर्याजी घोरपडे , रवींद्र पाटील , दिग्वीजय पाटील , दत्ता पाटील केनवडेकर ,विकास पाटील , देवानंद पाटील , फतेसिंह भोसले ,प्रवीण काळबर , प्रा. चंद्रकांत जाधव , सरपंच दिपक आंगज उपस्थित होते .


स्पर्धेत पंच म्हणून संदीप पाटील, बाबा शिरगावकर , आनंदा गोडसे , आकाश नलवडे , वैभव तेली , महेश पाटील , पांडूरंग पुजारी यांनी काम पाहिले.


स्वागत माजी नगरसेवक दिगंबर परीट यांनी तर प्रास्ताविक मुरगूड शहर राष्ट्रवादी अध्यक्ष रणजीत सुर्यवंशी यांनी तर सुत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले . शेवटी आभार डॉ. सुनिल चौगले यांनी मानले .

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.