इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू.

 इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू.


गांधीनगर:- उचगाव पैकी निगडेवाडी येथील  गोकुळधाम सोसायटीमागे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडून राणी भगवान भोसले (वय ४०, रा. उचगाव, ता. करवीर) यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ६) सकाळी निदर्शनास आली. याबाबतची फिर्याद पती  भगवान आनंदा भोसले रा. उचगाव ता. करवीर यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी भोसले कुटुंब उचगाव मध्ये सुरू असलेल्या चंदनलाल बचाराणी यांच्या बांधकामावर वॉचमन म्हणून पती-पत्नी काम करत होते. सोमवारी रात्री मुलगा गावाहून आल्याने समोर असलेल्या शेड मधून नवीन सुरू असलेल्या बांधकामावर रात्री झोपण्यास आले. अंधार असल्याने बांधकामावर असलेल्या पाण्याची टॉकी न दिसल्याने त्या मध्ये राणी भोसले पडल्या. पती भगवान यांनी रात्री शोधाशोध केली पण त्या मिळून आल्या नाही. मंगळवारी सकाळी बांधकामावर पाणी मारण्यासाठी भगवान यांनी पाण्याच्या टाकीमध्ये पाहिले असता पत्नी राणी या पाण्याच्या टाकीत पडल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती गांधीनगर पोलीसांना देण्यात आली. घटनास्थळी गांधीनगर ची पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरनीय तपासणीसाठी सीपीआर मध्ये पाठवण्यात आला. सीपीआर मधील आरोग्य अधिकारी यांनी गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. राणी भोसले यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा परिवार आहे. या मृत्यूची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.