गडमुडशिंगीत भानामतीचा प्रकार : माळी कुटुंब भयभीत.
गडमुडशिंगीत भानामतीचा प्रकार : माळी कुटुंब भयभीत.
गांधीनगर:- गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे वसगडे शिवेवरिल माळी मळ्यात रविवारी (ता. ४ )पहाटे भानामतीसदृश प्रकार घडल्याने राजेश अण्णासो माळी व त्यांचे कुटुंब अत्यंत भयभीत झाले असून, संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी
रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास देवदर्शनासाठी जाण्याच्या तयारीत असताना राजेश माळी यांच्या निदर्शनास घरासमोर विचित्र साहित्य आले. त्यामध्ये पाच बाहुल्या तीन धारी लिंबू, चार साधे लिंबू, चार शंख, दोन अंडी, काळा व रंगीत दोरा, मोहरीचे तेल, हळद, कुंकू, उलट्या पिळाचा पंचधातूचा मोळा असे साहित्य दिसून आले.
विशेष म्हणजे यातील दोन भावल्यांना दोरीने गळा आवळल्याचे दिसून आल्याने माळी कुटुंबीयांचा थरकाप उडाला.
घटनास्थळी योगायोगाने गांधीनगर पोलीस ठाण्याचे गस्त घालणारे कर्मचारी जात होते. त्यांनी दृश्य पाहून त्वरित माळी मळा परिसरात पोहोचून कुटुंबीयांना धीर दिला. पोलिसांनी उजाडेपर्यंत परिसरात गस्त घालून संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
सदर प्रकार याआधीही शुक्रवारी पहाटे नीता माळी यांच्या निदर्शनास आला होता. त्या वेळी देखील बाहुल्या, लिंबं, दोरे यांसारखी भानामतीसदृश साहित्य मुख्य दरवाज्यासमोर ठेवलेले होते. दोन दिवसात अशा घटना घडल्याने कुटुंबीयांच्या मनात अधिकच भीती निर्माण झाली आह
अशा आघोरी कृत्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या कृत्यांमागील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी पाटील यांनी माळी कुटुंबीयांची भेट घेऊन या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, भानामती करणाऱ्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तत्काळ कारवाई केली पाहिजे.
फोटो ओळ:-
गडमुडशिंगी ता करवीर येथील माळी मळा येथे आघोरी प्रकारातून भानामतीचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Comments
Post a Comment