ओपन जेवू देईना, तर क्लोज झोपू देईना.
ओपन जेवू देईना, तर क्लोज झोपू देईना.
-------------------------------
कोल्हापूर /प्रतिनिधी
शशिकांत कुंभार.
-------------------------------
ओपन मटक्यासह अवैध धंद्यांना आळा घालण्याचे नुतन पोलीस अधीक्षकांना आव्हान.
कोल्हापूर जिल्हा मटका अड्ड्यांनी पोखरला आहे.गोरगरिबांच्या संसार देशोधडीला लागलेत.गेली अडीच वर्षे कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यातील अनेक गावांमध्ये खुलेआम अवैध धंद्यांना ऊत आला आहे. गावागावात मटका खेळाडूंची संख्या प्रचंड आहे. यामध्ये तरुण पिढी सह वयस्कर व्यक्ती या मटक्याच्या आहारी गेली आहेत. जिकडे तिकडे बिनधास्त मटका सुरू आहे. कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला आळा घातला नाही. मात्र सर्व अलबेल असल्याचे चित्र तयार केले जात होते. ओपन जेवू देईना, तर क्लोज झोपू देईना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मटका खेळणाऱ्याच्या मनाची बैचनी सतत वाढत आहे. सकाळ संध्याकाळी मटका अड्ड्यांवर मटका खेळाडूंची पावले ऑटोमॅटिक वळत असतात. अक्षरशः मटका व अवैध व्यवसायिकांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उच्छाद मांडला आहे.
कोल्हापूर पोलीस हे महाराष्ट्र पोलीस दलातील एक भाग असुन विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्या अधिपत्याखाली या शहराचा कारभार चालतो.
या शहराला दोन अप्पर पोलीस अधिक्षक सहा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अधिपत्याखाली विभागले असून एकूण 31 पोलीस ठाण्याचा कारभार चालत आहे, परंतु एवढी मोठी पोलीस यंत्रणा असताना कोल्हापूर शहरामध्ये ऑनलाइन मटका, व्हिडिओ गेम, कसीनो, कल्याण मटका, गुटखा ,गोवा बनावटीची दारू गांजा याची विक्री मोठ्या प्रमाणात विकली जात आहे .आतातरी पोलीस अधीक्षक बेकायदेशीर धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार काय? या अवैध धंद्यांच्या आकाना वेसन घालणार का?असा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यातील जन मानसातून बोलला जात आहे. मटका बुकीचे केंद्र उध्वस्त करून आळा घातला तरच ही कीड नाहीशी होऊ शकते. नूतन पोलीस अधीक्षकांनी ही दमदार कामगिरी केली तर त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कौतुकच होईल.
Comments
Post a Comment