स्वामीकडून भक्ताच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार स्वामीला पोलिसांकडून अटक पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.
स्वामीकडून भक्ताच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार स्वामीला पोलिसांकडून अटक पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.
----------------------------------
रायबाग प्रतिनीधी
बबन जामदार
----------------------------------
रायबाग तालुक्यातील मेखळी गावातील घटना .
चिकोडी.एका स्वामीकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यासोबतच तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना रायबाग तालुक्यातील मेखळी येथे उघडकीस आली आहे.
याप्रकरणी लोकेश्वर नावाच्या स्वामीजी ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रायबाग तालुक्यातील मेखळी येथील राम मंदिर मठाचे लोकेश्वर स्वामीजी या स्वामीजींने मुडलगी तालुक्यातील मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर स्वामीजी मुलीच्या कुटुंबीयाच्या ओळखीचा असल्याने, घराकडे रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला आपल्या कारमधून घरापर्यंत सोडतो असे सांगून कारमध्ये बसवून घेतो. घर आल्यानंतर देखील गाडी न थांबवता बागलकोट मार्गे रायचूर पर्यंत नेऊन, एका लॉज मध्ये मुलीवर सातत्याने अत्याचार केला आहे. त्यानंतर महालिंगपूर बस स्थानकात मुलीला सोडून, घरच्यांना या बदल सांगितल्यास तुला मारून टाकू अशी धमकी दिली.
यानंतर सदर मुलींना घरच्यांना सांगितल्यानंतर स्वामिनी केलेला अत्याचार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी बागलकोट महिला पोलीस स्थानकात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून, बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी पोलीस ठाण्याला प्रकरण हस्तांतरित करण्यात आले आहे. याप्रकरणी मुडलगी पोलिसांनी स्वामीजीला अटक केली आहे.
यानंतर पोलिसांनी मठावर धाड टाकल्यावर मठामध्ये तलवारी चाकू कोयता शस्त्रे मिळाली आहेत. दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये मटका नंबर सांगण्याचे स्वामीजी करीत आहे. पैशाच्या आमिषाने दुसऱ्या जिल्ह्यातील फक्त लोक मोठ्या प्रमाणात येत असतात. या स्वामीजी मुळे गावचे नाव खराब होत असल्याचा आक्रोश ग्रामस्थांनी व पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे.
उत्तर कर्नाटकात अशा प्रकारचे अनेक भोंदू, कामुक स्वामीजींचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे अशा भोंदू स्वामीजींवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
Comments
Post a Comment