जिल्हा परिषद च्या प्राथमिक शाळेची शैक्षणिक क्षेत्रात चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून मोठी भरारी,प्राध्यापकअर्जुन आबिटकर.

 जिल्हा परिषद च्या प्राथमिक शाळेची शैक्षणिक क्षेत्रात चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून मोठी भरारी,प्राध्यापकअर्जुन आबिटकर.


------------------------------------ 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

------------------------------------ 

 राधानगरी तालुक्यातील कौलव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने शैक्षणिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. ग्रामपंचायत कौलव आणि चंद्रकांत दादा पाटील कौलवकर यांच्या महत्त्वपूर्ण योगदानातून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली आहे, असे प्रतिपादन के डी सी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी केले.

केंद्र शाळा कौलव येथे विविध परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात जिल्ह्यातील पहिली सौर ऊर्जा प्रकल्प आणि पेव्हिंग ब्लॉक या विकासकामांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्राचार्य श्री अर्जुन आबिटकर आणि चंद्रकांतदादा पाटील कौलवकर यांनी स्वतःच्या खर्चातून सुमारे १.५० लाख रुपये खर्च करून शाळेच्या स्वागत कमानीचे अनावरण केले.

याव्यतिरिक्त, चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ हजार रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी सरपंच रामचंद्र कुंभार, उपसरपंच सरिता पाटील, माजी उपसरपंच अजित पाटील, सदस्य विशाल कुंभार, सदस्य प्रकाश कांबळे, बाबासो पाटील, युवा नेते प्रकाश हुजरे, युवा नेते सत्यजित चरापले, उत्तम चरापले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष हेमंत कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक पंडित चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.